Subscribe Us

CM Letter feedback link मा. मुख्यमंत्री यांच्या संदेश पत्रावरील विद्यार्थी अभिप्राय नोंदविण्यासाठी लिंक

 CM Letter feedback link

मा. मुख्यमंत्री यांच्या संदेश पत्रावरील विद्यार्थी अभिप्राय नोंदविण्यासाठी लिंक



 "मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा" या उपक्रमांतर्गत शासकीय व खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला आहे. राज्यातील १.०३.३३३ शाळांनी अभियानात सहभाग नोंदविला असून शाळा, विद्यार्थी, शिक्षक व पालकांमध्ये उत्साहाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसत आहे. सदर अभियानांतर्गत मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेले संदेश पत्र हे सर्व शाळांमधील 2 कोटी 11 लाख मुलांपर्यंत पोहचविण्यात आलेले आहे. या पत्रामध्ये मा. मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यातील बालकांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर प्रकाश टाकला असून, राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून "मुख्यमंत्री माझी शाळा. सुंदर शाळा" या अभियानाचा प्रारंभ केलेला आहे.

राज्य शासनाने या अभियानांतर्गत www.mahacmletter.in हे संकेतस्थळ विकसित केलेले आहे. या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना शिक्षण विषयक अभिप्राय नोंदविण्याची सुविधा देण्यात आलेली आहे. 

मा. मुख्यमंत्री महोदय यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून लिहीलेल्या पत्रातील मजकूर व शिक्षण विषयक अभिप्राय हस्ताक्षरात फोटो उपरोक्त नमूद संकेतस्थळावर अपलोड करावयाचा आहे. 

मा आयुक्त शिक्षण यांचे अभिप्राय UPLOAD करण्याबाबत  पत्र   वाचा CLICK HERE

मा आयुक्त शिक्षण यांचे सेल्फी  UPLOAD करण्याबाबत  पत्र   वाचा CLICK HERE

अभिप्राय  व सेल्फी UPLOAD करण्याबाबत USER MANUAL  CLICK HERE

  अभिप्राय  व सेल्फी UPLOAD  करण्यासाठी  लिंक   

CLICK HERE

विद्यार्थ्यांनी लिहीलेला अभिप्राय कसे upload करावे सोपी पद्धत VIDEO

गिनीज बुक रेकॉर्ड बाबत काही महत्वाच्या सूचना

कूण 3 विषयावर विद्यार्थी अभिप्राय लिहू शकतील.

• मा मुख्यमंत्री महोदयांचे संदेश पत्र
• आपल्या शाळेविषयी मत
• शिक्षणाचे जीवनातील महत्त्व

उपक्रमाचे नाव : Largest online photo album of "Handwritten Notes in 24 hours".

कार्यपध्दती :

१) पालकांनी मा. मुख्यमंत्री महोदय यांचे पत्र मुलांना सोबत घेऊन वाचावयाचे आहे. २) हे पत्र वाचून झाल्यावर त्यांनी छोटया वहीचे एक पान व एक बॉलपेन घ्यायचे आहे.

३ ) या पानावर मुलांनी बॉलपेनाने स्वतःच्या हस्ताक्षरात या पत्राविषयी त्यांचा शिक्षण विषयक अभिप्राय नमूद करणे

अपेक्षित आहे. लहान वयोगटातील विद्यार्थ्यांना लेखन शक्य नसल्यास त्यांच्या पालकांच्या हस्ताक्षरात लेखन करता येईल. ज्या पालकांना लेखन करता येत नाही त्यांच्या वतीने अन्य व्यक्तींकडून लेखन करुन घेता येईल.

४ ) हा अभिप्राय ५ ते ६ ओळीमध्ये असावा. ५) अभिप्राय लिहून झाल्यावर पालकांनी अभिप्राय लिहिलेल्या पानाचा फोटो आपल्या मोबाईलच्या कॅमे-यात काढायचा आहे.

६) त्यानंतर शिक्षण विभागाच्या www.mahacmletter.in वेबसाईटवर जाऊन स्वत:च्या नावाने रजिस्ट्रेशन करणे अपेक्षित आहे.

७) त्यानंतर हस्ताक्षरातला अभिप्रायाचा फोटो अपलोड करावयाचा आहे.



महत्त्वाचे सूचना



याबाबत करावयाच्या कृतीबाबत फ्लोचार्ट सोबत जोडलेला असून त्याप्रमाणे सर्व शाळास्तरापर्यंत सर्व विद्यार्थ्यांना सूचना पोहोच होतील याची दक्षता घेण्यात यावी. सदर उपक्रमाचा दि. २६.०२.२०२४ वेळ सकाळी ०९.०० ते दि. २७.०२.२०२४ सकाळी ०८.५९ आहे.

विद्यार्थी मोबाईल क्रमांक व captcha टाका




विद्यार्थ्यांचे नाव  शाळेचे नाव  जिल्हा तालुका टाका 


विद्यार्थ्यांनी लिहलेल्या अभिप्राय upload करा



विद्यार्थ्यांनी लिहलेला अभिप्राय upload झाल्यावर पुढीलप्रमाणे message येईल



आपण एकाच मोबाईल वरून लिंक open करून  विद्यार्थी मोबाईल टाकून अनेक विद्यार्थी अभिप्राय upload करू शकतात


Post a Comment

0 Comments