विस्तार अधिकारी शिक्षण , केंद्रप्रमुख पदासाठी १० जून २०१४ च्या अंतीम अधिसूचनेनुसार होणार भरती प्रक्रिया
महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७ मध्ये – विस्तार अधिकारी शिक्षण , केंद्रप्रमुख , या पदाच्या विद्यमान अर्हता व नेमणुकीच्या पद्धती मध्ये ग्रामविकास व जलसंधारण विभागच्या वतीने २० सप्टेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध केलेल्या राजपत्रातील मसुद्यानुसार बदल करण्यात आलेले असून अंतीम अधिसूचना १० जून २०१४ रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे. .
नवीन जिल्हा सेवा सुधारणा नियम 2013 च्या मसुद्यातील पुढील प्रारूप १० जून २०१४ च्या अधिसूचनेनुसार कायम करण्यात आले आहे
१ विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी २ वर्ग ३ पदासाठी पात्रता
पात्रता : 1) 50टक्के गुणासह पदवी व B.Ed.
2) अध्यापनाचा / प्रशासनाचा 3 वर्षाचा अनुभव
3) जि प सेवेत नसलेल्या साठी वयो मर्यादा 36 वर्ष ( प्रवर्गानुसार वयोमर्यादा शिथील असेल )
निवड : 1) सरळसेवेद्वारे 50टक्के
2) जि.प.न.प./मा.शि. /मुख्या/ केंद्रप्रमुख यांच्यातुन विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे 25टक्के
3) सेवाजेष्ठतेने पदोन्नती 25टक्के
50:25:25 प्रमाणात सरळ सेवा ,विभागीय स्पर्धा ,पदोन्नती ने पदे भरली जाणार आहेत .
विस्तार अधिकारी शिक्षण श्रेणी ३ वर्ग ३ हे पद रद्द करण्याबाबत उल्लेख असला तरी १० जून २०१४ च्या अंतिम अधिसूचनेत तसा उल्लेख नसल्या कारणामुळे हे पद अद्यापही महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम १९६७ प्रमाणे कायम आहे
१० जून २०१४ ची अधिसूचना RR वाचा DOWNLOAD
२. केंद्रप्रमुख पदासाठी पात्रता
पात्रता : 1) 50 टक्के गुणासह पदवी व B.Ed.
2) अध्यापनाचा / प्रशासनाचा 3 वर्षाचा अनुभव
3)जि प सेवेत नसलेल्यासाठी वयोमर्यादा 36 वर्ष ( प्रवर्गानुसार वयोमर्यादा शिथील असेल )
निवड : 1) सरळसेवेद्वारे 40 टक्के
2) जि.प.न.प./मा.शि. /मुख्या/ केंद्रप्रमुख यांच्यातुन विभागीय स्पर्धा परीक्षाद्वारे 30 टक्के
3) सेवाजेष्ठतेने पदोन्नती 30 टक्के
4) भाषा , गणित विज्ञान , समाजिक शास्त्र नुसार पदे भरली जातात.
40:30:30 या प्रमाणात सरळ सेवा ,विभागीय स्पर्धा ,पदोन्नती ने पदे भरली जाणार आहेत .
एकूण मंजूर पदापेकी भाषा गणित व विज्ञान सामाजिक शास्त्र या विषयासाठी समप्रमाणात पदाची विभागणी असून
त्यात १)भाषा- मराठी ५० टक्केइंग्रजी ३० टक्के हिंदी टक्के २)गणित व विज्ञान 100 टक्के ३)सामाजिक शास्त्र इतिहास भूगोल टक्के विभागणी करण्यात येणार आहे
दिनांक ०१-१२-२०२२ पूर्वी केंद्र प्रमुख पदभरती संदर्भात निघालेल्या सर्व शासन निर्णय/ शासन शुद्धिपत्रक अधिक्रमित करून दि. ०१-१२-२०२२ रोजीचा शासन निर्णय अंतिम करण्यात आलेला असून सदर शासन निर्णयात विषया संबंधित कोणताही उल्लेख केलेला नाही. तसेच शासन शुद्धिपत्रक दि. ०९/०३/२०२३ नुसार पदोन्नती करीता प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) यामधूनच केंद्र प्रमुख पदी पदोन्नती बाबत निर्देश आहेत..
केंद्रप्रमुख पदाच्या भरतीसाठी शासनाचे नवे शुद्धीपत्रक केंद्रप्रमुख होण्यासाठी कोण आहेत पात्र शिक्षक ? CLICK HERE
Kendrapramukh All GR केंद्रप्रमुख पदाचे विविध शासन निर्णय (पद निर्मिती , कर्तव्य व जबाबदारी) १९९४ ते आजपर्यत CLICK HERE
केंद्रप्रमुख पदे प्राथमिक शिक्षकांमधून 50 टक्के पदोन्नतीने व 50 टक्के विभागीय स्पर्धा परीक्षाने भरणार शासन निर्णय दिनांक ०१.१२.२०२२ CLICK HERE
१ १० जून २०१४ ची अधिसूचना RR वाचा DOWNLOAD
२ केंद्रप्रमुख पदे भरण्याची कार्यपद्धती शासन निर्णय दिनांक १६ फेब्रुवारी २०१८ DOWNLOAD
3 २० सप्टेंबर २०१३ रोजी प्रसिद्ध केलेला अधिसूचना RR मसुद्या DOWNLOAD
0 Comments