Subscribe Us

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२२-२३ च्या आयोजनाबाबत...

 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२२-२३ च्या आयोजनाबाबत...

उपसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचे दिनांक30जुलै चे पत्र CLICK HERE

सहसंचालक  पुणे  यांचे दिनांक  ०१/११/२०२२ चे पत्र  CLICK HERE 

 राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२२-२३  माहिती पत्रक  CLICK HERE 

                                                                

 प्रमाणपत्र नमुना  CLICK HERE 

राज्यातील सर्व नवोपक्रमशील शिक्षक व अधिकारी हे विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सतत प्रयत्न करत असतात. नवोपक्रमाच्या माध्यमातून आपल्या कल्पनांना व सृजनशील विचारांना मूर्त स्वरूप देण्याकरिता तसेच विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्या समस्या सोडविण्याच्या अनुषंगाने नवनवीन उपक्रम हाती घेत असतात. सर्वच स्तरातील शिक्षक व अधिकारी यांच्या या कल्पकतेला व सृजनशीलतेला प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी परिषदेमार्फत राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार या वर्षीही राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा सन २०२२-२३ चे पुढील पाच गटात आयोजन करण्यात येत आहे.

  • १. पूर्व प्राथमिक स्तरावरील अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका
  • २. प्राथमिक शिक्षक व मुख्याध्यापक
  • ३. माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक 
  • ४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती विषय सहायक, विषय साधन व्यक्ती, समावेशित साधन व्यक्ती व ग्रंथपाल गट
  •  ५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)

नवोपक्रम स्पर्धा सन २०२२-२३ पहिल्या टप्प्यात गट १ व ३ यासाठी जिल्हा / DIET व गट क्र. ४ व ५ साठी प्रादेशिक विद्या प्राधिकरण (RAA) स्तरावर घेण्यात येणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोपक्रमशील शिक्षक, शिक्षक प्रशिक्षक व अधिकाऱ्यांना सहभाग घेण्यासाठी  आवाहन करण्यात येत आहे  

 अधिकारी, शिक्षक, अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांनी  https://scertmaha.ac.in/innovation/ या लिंकवर दि. ०२/११/२०२२ ते दि.२०/११/२०२२ या कालावधीत आपले नवोपक्रम अहवाल सादर करावे असे आवाहन  श्री रमाकांत काठमोरे सहसंचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांनी केले आहे 


अत्यंत महत्वाची सूचना

नवोपक्रम लिंक भरण्यापूर्वी आपण पुढील तयारी केली आहे काय ?

१. नवोपक्रम अहवालाची pdf फाईल
२. नवोपक्रम अहवालाची Word फाईल
३. प्रमाणपत्र व प्रतिज्ञापत्र Pdf फाईल
४. स्पर्धकांचा स्वतःचा पासपोर्ट आकाराचा फोटो
५. आवश्यकतेनुसार आपल्या व्हिडिओची Youtube लिंक

हे पूर्णतः तयार करूनच आपण लिंक भरायला सुरुवात करावी.

सन २०२१-२२ राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेतील अहवाल  CLICK HERE

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा साठी अहवाल लेखन कसे करावे ?  CLICK HERE

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा प्रसिद्धीपत्रक 2019-20   CLICK HERE

राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा माहितीपत्रक 2021-22  CLICK HERE

नवोपक्रम म्हणजे काय ?   नवोपक्रमाचे विषय    CLICK HERE



Post a Comment

0 Comments