Subscribe Us

शिक्षक बदली विशेष संवर्ग १ व २ ने मोबाईलवर अर्ज कसा भरावा ?

शिक्षक बदली विशेष संवर्ग १ व २ ने मोबाईलवर अर्ज कसा भरावा ? 









ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष झाले परंतु शाळेवर 5 वर्ष झाले नाहीत अशा शिक्षकांना वरील मेसेज येत आहे.
याबाबत संवर्ग 1 मधील शिक्षकांना बदली पात्र नसतांना आम्हाला होकार / नकार द्यावा लागेल का असा प्रश्न पडला आहे?
याबाबत स्पष्ट करण्यात येते की, जे संवर्ग 1 मधील बदली पात्र शिक्षक व ज्या संवर्ग 1 मधील  शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष झाले परंतु शाळेवर 5 वर्ष झाले नाहीत अशा सर्व  शिक्षकांना बदलीसाठी होकार / नकार  द्यावा लागेल.
र तुम्ही होकार / नकार दिला नाही तर पोर्टलला कसे कळणार तुम्ही संवर्ग 1 आहात म्हणून , त्यामुळे जर तुम्ही होकार / नकार दिला नाही आणि तुम्हाला जर सध्याच्या क्षेत्रात 10 वर्ष पूर्ण झाले परंतु शाळेवर 5 वर्ष पूर्ण झाले नाही तर तुमचा विचार अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरतांना जेष्ठतेनुसार होऊ शकतो.
सर्व शिक्षकांना विनंती करण्यात येते की , आपण कुठल्याही अनधिकृत पोष्ट वर विश्वास ठेवू नये. बदली फॉर्म भरण्या अगोदर vincys कडून पोर्टलवर दिलेले अधिकृत विडीयो बघावे तसेच ग्रामविकास विभागाकडून निर्गमीत शासन निर्णय व शासन  परिपत्रक यांचे काळजी पूर्वक वाचन करावे.


पोर्टल वर लॉगिन केल्यानंतर पोर्टलच्या डाव्या मेनूमध्ये intra district टॅब दिसेल

या टॅब वर क्लिक केले की application form टॅब दिसू लागेल




त्यावर क्लिक केले की apply cadre 1. व apply cadre 2

हे दोन टॅब दिसतील

जे शिक्षक विशेष संवर्ग 1 चा लाभ घेऊ इच्छिता त्यांनी apply cadre 1 वर क्लिक करावे 





व जे शिक्षक विशेष संवर्ग 2 चा लाभ घेऊ इच्छितात त्यानी apply cadre 2 वर क्लिक करावे

विशेष वर्ग भाग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांची बदली ही त्यांच्या खालील प्राधान्य क्रमानुसार होईल*शासन निर्णय 7 एप्रिल 2021 चे आदेशातील*व्याख्यातील प्राधान्य क्रमानुसार च्या सेवाजेष्ठतेनुसार जन्मतारखेप्रमाणेव आडनावातील पहिल्या इंग्रजी आद्याक्षराप्रमाणे

वरील प्राधान्य क्रमानुसार बदली पात्र शिक्षकांच्या जागेवर बदली देण्यात येईल तसेच विशेष स़वर्ग भाग एक मध्ये येणाऱ्या शिक्षकांना सक्षम अधिकाराचे प्रमाणपत्र आपल्या वरिष्ठ कार्यालयाला जमा करणे अनिवार्य आहे तसेच हे प्रमाणपत्र जर अवैद्य ठरल्यास किंवा प्रमाणपत्र देण्यास असमर्थ ठरल्यास वरील शिक्षकांचा बदली अर्ज रद्द करण्यात येईल

वरील स्विकारण स्विकारल्यानंतर विशेष संवर्ग भाग एकच्या शिक्षकांना बदली अर्ज दिसू लागेल या अर्जामध्ये शिक्षकाचे नाव ,आडनाव, शालार्थ आयडी,व शाळेचा यु-डायस क्रमांक दिसून येईल

त्याखाली ज्या शिक्षकांचे नाव बदली पात्र यादीमध्ये आलेले असून त्यांना बदलीतून सूट हवी असेल म्हणजेच बदली नको असेल तर अशा शिक्षकांनी dropdown मधून Yes हा पर्याय निवडावा


 व ज्या शिक्षकांना बदली प्रक्रियेतून सूट नको असेल म्हणजेच बदली हवी असेल तर अशा शिक्षकांनी dropdown मधून No हा पर्याय निवडावा
संवर्ग १ चा अर्ज भरताना ज्यांना संवर्ग १ मधून बदली हवी आहे त्यांनी I should be Exempted from Transfer? ( मला बदलीतून सूट मिळावी) या रकाण्यात NO नोंदवायचे आहे.

संवर्ग १ चे जे शिक्षक बदलीपात्र आहेत (सध्याच्या क्षेत्रात १० वर्ष व सध्याच्या शाळेत ५ वर्ष) परंतू त्यांना बदली नको आहे त्यांनी या रकाण्यात YES नोंदवायचे आहे.




त्याखालील dropdown मधून विशेष संवर्गाचा प्रकार निवडावा
त्या ठिकाणी Self व Spouse हे दोन पर्याय दिसतील
Self म्हणजे विशेष संवर्ग एकच्या शिक्षकांनी स्वतः संदर्भात असलेल्या आजाराचा प्राधान्यक्रम निवडायचा आहे त्याखालील dropdown मधून आपल्या संबंधित असलेला आजाराचा प्राधान्यक्रम निवडावा*
 आपला अर्ज सबमिट करावा



ज्या शिक्षकांना शाळेवर तीन वर्ष पूर्ण झालेले नाही त्यांना संवर्ग १ व २ मधून अर्ज भरता येणार  नाही 






शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग १ व भाग २ अर्ज कसा भरावा?       CLICK HERE

विशेष संवर्ग  भाग-१  शिक्षक बदलीबाबत संपूर्ण  माहिती  CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-२  जिल्हांतर्गत बदलीबाबत संपूर्ण माहिती  CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-३   बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-४  बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती CLICK HERE 



शिक्षकाचे वय 53 वर्ष किंवा 53 वर्षापेक्षा जास्त झाले असेल व त्यांचे नाव बदली पात्र यादीमध्ये असेल तर अशा शिक्षकांना बदलीतून सूट हवी असेल तर त्यांनी Yes हा पर्याय निवडून Self मधील dropdown मधील 13 क्रमांकाचा मुद्दा प वयाने 53 वर्ष झालेले कर्मचारी हा पर्याय निवडून अर्ज सबमिट करावा

कोणत्याही शिक्षकाला फक्त एका वेळी एकाच संवर्गाचा लाभ मिळू शकेल

एखाद्या शिक्षकांनी संवर्ग एक मध्ये अर्ज केला असेल तर त्याला संवर्ग दोन चा लाभ मिळणार नाही पर्यायाने आपल्या जोडीदार संवर्ग दोन मध्ये असेल तर तो विस्थापित होईल

विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांची अर्ज भरण्याची प्रक्रिया

जे शिक्षक संवर्ग दोन मध्ये येतात त्यांनी अर्ज भरतांना Apply cadre 2 या टॅब वर क्लिक करावे 

क्लिक केल्यानंतर त्याखालील एक स्विकरण स्विकारावे लागेल त्याशिवाय अर्ज दिसणार नाही ते खालील प्रमाणे

विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांना सक्षम अधिकाराचे अंतराचे प्रमाणपत्र वरिष्ठ कार्यालयाला देणे अनिवार्य आहे हे प्रमाणपत्र देण्यास शिक्षक असमर्थ असेल तर त्यांचा अर्ज रद्द करण्यात येईल

वरील प्रकारचे स्विकरण स्विकारल्यानंतर शिक्षकाचा अर्ज स्क्रीनवर दिसून येईल

अर्जावर शिक्षकाचे नाव ,आडनाव ,शालार्थ आयडी व शाळेचा यु डायस क्रमांक दिसून येईल*

त्याखालील आपल्याला आपल्या जोडीदाराच्या कार्यालयातील किंवा शाळेतील अंतर द्यावे लागेल हे अंतर 30 किलोमीटर पेक्षा जास्त असेल

त्यानंतर खालील दिलेल्या dropdown मधून आपल्या विशेष संवर्ग भाग दोन चा प्राधान्यक्रम निवडावा लागेल

वरील पर्याय विशेष संवर्ग भाग दोनच्या व्याख्येतील प्राधान्य क्रमाने असतील

जर तुम्ही 1.9.1 पहिला पर्याय पती-पत्नी दोघीही जिल्हा परिषद चे कर्मचारी हा पर्याय निवडल्यास त्याखालील जोडीदाराचा शिक्षक प्रकार निवडावा लागेल

त्याखालील जर आपण Primary हा पर्याय निवडला तर तेथे जोडीदाराचा मोबाईल क्रमांक किंवा शालार्थ आयडी टाकावा लागेल हा पर्याय दोन्ही पती-पत्नी जिल्हा परिषद चे शिक्षक असून या बदली प्रक्रियेमध्ये असतील अशा शिक्षकांसाठी आहे

त्याखाली आपल्याला एक स्विकारण स्विकारावे लागेल ते खालील प्रमाणे

आपल्या जोडीदाराने संवर्ग एक मधून अर्ज भरलेला असल्यास व आपण पती-पत्नी  एकत्रीकरण अंतर्गत विशेष वर्ग भाग दोन मधून अर्ज करत असल्यास दोघांनाही एकाच संवर्गातून अर्ज करणे अनिवार्य असल्यामुळे आपण विस्थापित होऊ शकता हे मला मान्य आह

वरील स्विकारण स्विकारल्यानंतर लगेच आपल्याला आपल्या जोडीदाराचे नाव, शाळेचे नाव ,शाळेचा यु-डायस क्रमांक स्क्रीनवर दिसून येईल.

त्याखालील सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर आपला अर्ज सबमिट होईल

जर आपण जोडीदाराचा शिक्षक प्रकार other than primary हा पर्याय निवडल्यास म्हणजेच हा पर्याय सुद्धा प्राधान्यक्रमातील 1.9.1 एक मधील पती-पत्नी दोघेही जिल्हा परिषद कर्मचारी असतील त्यापैकी एक शिक्षक असेल व एक जिल्हा परिषद चा शिक्षक अथवा कर्मचारी असेल अशांकरिता लागू आहे

आपणास जोडीदारचा मोबाईल नंबर किंवा शालार्थ आयडी टाकावा लागेल

त्यानंतर जोडीदार चे नाव, शाळेचे नाव, युडायस क्रमांक व उपलब्ध असलेली माहिती टाकून सबमिट करावा

आपणास जर पहिल्या पर्याय व्यतिरिक्त (1.9.2 ते 1.9.6 )दुसरा कोणताही पर्याय असल्यास तो पर्याय निवडून अर्ज सबमिट करावा

तसेच विशेष संवर्ग भाग दोन च्या शिक्षकांनी दोघांनाही एकाच संवर्गातून अर्ज करणे अनिवार्य आहे जर दोघांपैकी एकाने संवर्ग एक मधून व दुसऱ्याने संवर्ग दोन मधून अर्ज केल्यास संवर्ग दोन मधून अर्ज करणारा शिक्षक विस्थापित होऊ शकतो

पोर्टलवर फॉर्म कसा भरावा याबाबत विन्सिस सॉफ्टवेअर कंपनी कडून पाठवलेला VDO काळजीपूर्वक पाहावा.


संवर्ग 1 च्या शिक्षकांच्या मनात असलेले काही प्रश्न ..

1) मला बदली नको तरीही फाॅर्म भरावा लागेल काय?

स्पष्टीकरण-जर तुम्हाला सध्याचे शाळेत 5 वर्ष व सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष झाले असेल तर तुमचे नाव बदली पात्र यादीत येईल व तुम्हाला बदली नको असल्यामुळे फाॅर्म भरून नकार द्यावा लागेल.

2) संवर्ग 1 आहे,बदली हवी आहे, माझी बदली होईल का?

स्पष्टीकरण-तुम्ही संवर्ग एक आहात त्यामुळे तुम्हाला पाच वर्ष किवा सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष अशी अट नाही.त्यामुळे तुम्ही बदली फाॅर्म भरू शकता ,बदली मिळेल 

3) मी मागीतलेले गाव मिळाले नाही तर विस्थापित होईल का?

स्पष्टीकरण-तुम्ही संवर्ग 1 आहात त्यामुळे तुम्ही भरलेली गावे मिळाली नाही तर तुमची बदली होणार नाही सध्या आहात तीथेच राहाल.

4) पूर्ण 30 गावे भरणे आवश्यक आहे का?

स्पष्टीकरण-पूर्ण 30 गावे भरण्याचे बंधन नाही तुमच्या आवडीची जेवढी गावे भरायची आहेत तेवढी सुद्धा टाकून फाॅर्म सबमीट करू शकता.भरलेली गावे मिळाली नाही तर आहे त्याच शाळेत राहाल.

5) शाळेत 5 वर्ष झाले नाही तर बदली मागता येईल का?

स्पष्टीकरण-होय संवर्ग 1 आहात त्यामुळे शाळेत पाच वर्ष झाले नाही तरी बदली पाहीजे असल्यास बदली मागता येईल कारण संवर्ग एक ला तशी अट नाही.(मात्र संवर्ग 1 मधून एकदा बदली घेतली तर पुढील तीन वर्ष बदली मिळणार नाही.

6) शाळेत 5 वर्ष झाले नाही,संवर्ग 1 आहे,बदली नको आहे तर नकाराचा फाॅर्म भरावा लागेल का?

स्पष्टीकरण-सध्याचे शाळेत पाच वर्ष झाले नाही आणि संवर्ग 1 मधून बदलीही नको आहे तर  फाॅर्म भरायची गरज नाही.

शिक्षक जिल्हांतर्गत बदलीसंदर्भात दि. 7/4/2021 च्या जी आर नुसार स्पष्टीकरण...

(माहितीस्तव)





 

Post a Comment

0 Comments