Subscribe Us

जिल्हांतर्गत बदली नवीन तिसरे सुधारित वेळापत्रक व तारखांसह विश्लेषण

   जिल्हांतर्गत बदली नवीन सुधारित  वेळापत्रक  व तारखांसह विश्लेषण  दिनांक २८  नोव्हेबर २०२२

 प्रशासकीय कारणास्तव प्रस्तुत वेळापत्रकानुसार विशेष संवर्ग भाग-१ व २ च्या शिक्षकांच्या अर्जांची तपासणी करणे शक्य झालेले नाही. त्यामुळे संदर्भाधीन दिनांक १८.११.२०२२ च्या वेळापत्रकामध्ये सुधारणा करुन शिक्षकांच्या बदल्यांबाबत सुधारित वेळापत्रक निश्चित करणे आवश्यक आहे. राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे करावयाच्या  जिल्हांतर्गत बदल्यांबाबतचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे

 तिसरे सुधारित वेळापत्रक  पहा CLICK HERE

 जिल्हांतर्गत बदली पोर्टल  

 जिल्हांतर्गत बदली पोर्टल  आपला मो
बाईल नंबर खालील लिंक वर टाकून लॉगिन करून पाहावे

https://ott.mahardd.in/   

शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग १ व भाग २ अर्ज कसा भरावा?       CLICK HERE

 विशेष संवर्ग भाग 1 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.20/12/2022 ते 23/12/2022 (4 दिवस)

➡️ विशेष संवर्ग भाग 1 मध्ये येत असणाऱ्या शिक्षकांनी वरील 4 दिवसांमध्ये पोर्टलवर आपला 30 किंवा आपल्या  आवश्यकतेनुसार पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदवावा 

➡️ या शिक्षकांना आपल्या प्राधान्य क्रमानुसार शाळा न मिळाल्यास पूर्वीचीच शाळा कायम राहील

➡️ विशेष संवर्ग भाग 1 च्या शिक्षकांना सेवा कालावधीची अट नाही

 विशेष संवर्ग भाग 2 साठी प्राधान्यक्रम भरणे- दि.30/12/2022 ते 04/12/2022 (4 दिवस)

➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या  वरील प्रमाणे होकार दिलेल्या शिक्षकांनी 30 शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा 

➡️ परंतु आपल्या प्राधान्यक्रमानुसार शाळा न मिळाल्यास विशेष संवर्ग भाग 2 चे क्वचितच शिक्षक विस्थापित होऊ शकतात

➡️ विशेष संवर्ग भाग 2 च्या शिक्षकांना आपला जोडीदार ज्या तालुक्यात कार्यरत आहे त्या तालुक्यातील कोणतीही शाळा निवडता येते परंतु दुसऱ्या तालुक्यातील निवडताना जोडीदाराच्या 30 किलोमीटर अंतरापर्यंतची शाळा निवडावी

➡️ विशेष संवर्ग भाग 2 चे शिक्षक दोघांची सेवा क्षेत्रनिहाय सलग दहा वर्षापेक्षा कमी असेल व बदलीने सोय होत नसल्यास दोघांनाही नकार देता येतो


बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.10/01/2022 ते 14/01/2022 (4 दिवस)

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांनी आपल्या सेवाजेष्ठतेनुसार 30 शाळा चा प्राधान्यक्रम वरील दिवसांच्या कालावधीमध्ये ऑनलाइन पोर्टल वर नोंदवावा 

➡️ परंतु ज्या शिक्षकांना बदली नको असल्यास त्यांनी प्राधान्यक्रम न भरल्यास त्यांची बदली होणार नाही

➡️ तसेच बदली अधिकार पात्र शिक्षकाला अवघड क्षेत्रामध्ये सलग  10 वर्ष व एका शाळेवर सलग पाच वर्षे सेवा झालेली असल्यास  त्यांनी 30 शाळांचा प्राधान्यक्रम भरणे अनिवार्य राहील  वेंशीस कंपनीच्या मार्गदर्शनावरून

➡️ अन्यथा या शिक्षकांनी प्राधान्यक्रम न दिल्यास त्यांची रिक्त जाग्यावर बदली करण्यात येईल

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षक हे पुन्हा अवघड क्षेत्राचा प्राधान्यक्रम देऊ शकतात

➡️ बदली अधिकार पात्र शिक्षकांना पसंती क्रमाने शाळा न मिळाल्यास विस्थापित होऊ शकतात

 बदलीपात्र शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरणे- दि.20/01/2022 ते 24/01/2022 (4 दिवस)

➡️ ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये सलग दहा वर्ष व शाळेवर सलग पाच वर्ष झाली अशा शिक्षकांना सेवा जेष्ठतेने किमान 30 शाळांचा प्राधान्यक्रम वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये देणे अनिवार्य आहे

➡️ बदली पात्र शिक्षकांना शक्यतोवर अवघड क्षेत्रातीलच शाळा मिळतील

➡️ बदली पात्र शिक्षकांनी बदली करिता अर्ज करताना विवरण पत्र 1 मधील अ व आ पर्यायांपैकी आ पर्याय निवडणे सोयीचे होईल कोणताही पर्याय न निवडल्यास संबंधित शिक्षक हा प्रशासकीय बदलीस पात्र ठरेल

 विस्थापित शिक्षकांच्या राऊंडसाठी पर्याय भरणे. दि.30/01/2022 ते 03/01/2022 (4 दिवस)

➡️ विशेष संवर्ग भाग 1, विशेष संवर्ग भाग 2, बदली अधिकार पात्र शिक्षक तसेच बदली पात्र शिक्षक त्यांच्या बदली प्रक्रियेमधून विस्थापित झालेल्या शिक्षकांना वरील 3 दिवसांच्या कालावधीमध्ये पुन्हा 30 शाळांचा पसंती क्रम ऑनलाइन पोर्टल वर नोंदवावा लागेल 

 ➡️ विशेष संवर्ग भाग 1 विशेष संवर्ग भाग 2 मधील शिक्षकांनी  पहिल्यांदाच प्राधान्यक्रम देताना संवर्गनिहाय यादीचा अभ्यास व आपली सेवा जेष्ठता व असलेल्या रिक्त जागांचा योग्य ताळमेळ लावल्यास विस्थापित होणार नाहीत

 अवघड क्षेत्रातील राहिलेल्या रिक्त पदे भरण्यासाठी बदली प्रक्रिया चालवणे. दि. 14/02/2022 ते 17/02/2023 (4 दिवस)

➡️ अवघड क्षेत्रातील बदली पात्र शिक्षकांच्या बदली प्रक्रियेनंतर रिक्त जागा बदली पात्र शिक्षकांमधून पदस्थापित न झाल्यास ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रामध्ये 10 वर्षाचे वर सेवा झालेले असल्यास अशा शिक्षकांना शाळेच्या कालावधीची अट राहणार नाही अशा शिक्षकांना वरील  दिवसांच्या कालावधीमध्ये शाळांचा प्राधान्यक्रम ऑनलाइन पोर्टलवर नोंदवावा

 ➡️ या ठिकाणी अवघड क्षेत्रातील जेवढ्या जागा रिक्त असतील तेवढ्याच शिक्षकांना सेवाजेष्ठतेने व प्राधान्यक्रमाने अवघड क्षेत्रातील रिक्त जागांवर पदस्थापित केले जाईल

➡️ ज्या शिक्षकांना आपल्या सेवाजेष्ठतीने व पसंतीक्रमाने शाळा न मिळाल्यास त्यांना उर्वरित रिक्त जागांवर पदस्थापित केले जाईल


बदलीचे आदेश प्रकाशित करणे. दि. 18/02/2023 ते 18/02/2023 (1 दिवस)


जिल्हापरिषद शिक्षक बदली २०२२ सर्व महत्त्वाचे अपडेट  https://bit.ly/3n5wl9A

सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिता पदावधीची परिगणना दिनांक ३१ मे ऐवजी दिनांक ३० जून २०२२ पर्यंत करण्यास  शासन निर्णयान्वये तरतुद करण्यात आली आहे. तसेच सन २०२२ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांसाठी शासन निर्णयात विहित केलेल्या कालावधीनुसार बदल्यांबाबतची कार्यवाही संगणक प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.  शासन निर्णयानुसार होणारी कार्यवाही फक्त सन २०२२ मध्ये होणाऱ्या बदल्यांकरिताच लागू राहील.

आता ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे राज्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबत खालीलप्रमाणे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

 सुधारित वेळापत्रक वाचा 



शिक्षक बदली पोर्टल वेबसाईट    https://ott.mahardd.in/login   

सदरील नवीन बदली पोर्टलला भेट देण्यासाठी खालील CLICK HERE बटनाला क्लिक करा. 

शिक्षकांनी विशेष संवर्ग भाग १ व भाग २ अर्ज कसा भरावा?       CLICK HERE

विशेष संवर्ग  भाग-१  शिक्षक बदलीबाबत संपूर्ण  माहिती  CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-२  जिल्हांतर्गत बदलीबाबत संपूर्ण माहिती  CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-३   बदली अधिकारप्राप्त शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती CLICK HERE 

 विशेष संवर्ग शिक्षक भाग-४  बदलीपात्र शिक्षकांच्या बदल्या  संपूर्ण माहिती CLICK HERE 

जिल्हांतर्गत बदलीबाबत धोरणात्मक बाबी -प्रतिनियुक्ती व इतर CLICK HERE 

Vinsys IT Services Pvt Ltd चे बदली  बाबत विचारलेल्या महत्त्वाचे प्रश्नांची उत्तरे  ३ जून २०२२ 

CLICK HERE

ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष झाले परंतु शाळेवर 5 वर्ष झाले नाहीत अशा शिक्षकांना येत असलेल्या मेसेज बाबत स्पष्टीकरण

बदलीपात्र व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या याद्या पुन्हा प्रसिद्ध कशा व का कराव्यात?

विशेष संवर्ग शिक्षक भाग-१ व २ यांनी विनंती बदलीसाठी अर्ज करण्यासंदर्भात अधिक स्पष्टीकरण...



Post a Comment

0 Comments