पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमास मुदतवाढ ....
३० डिसेंबर पर्यत निरंतर पदवीधर मतदार नोंदणी (continuous updation) सुरु राहणार
पदवीधर मतदारसंघाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमास मुदतवाढ मिळणेबाबत राज्य निवडणूक आयोगाकडे पत्रे प्राप्त झालेली होती . भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक १/११/२०२२ या अर्हता दिनांकावर आधारीत नाशिक व अमरावती विभागातील पदवीधर मतदार संघासाठी नव्याने मतदार नोंदणी करण्याच्या कार्यक्रमांतर्गत दिनांक ७ नोव्हेंबर २०२२ पर्यंत दावे व हरकती स्वीकारण्याचा अंतिम दिनांक आहे. या कार्यक्रमांतर्गत दिनांक २३ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रारुप मतदार यादीची प्रसिध्दी झाल्यानंतर दिनांक २३ नोव्हेंबर, २०२२ ते दिनांक ९ डिसेंबर २०२२ या कालावधीत पुन्हा दावे व हरकती स्वीकारण्यात येणार असून आता या काळामध्ये सुध्दा पदवीधर मतदारसंघाची मतदार नोंदणी करता येणार आहे.
तसेच दिनांक ३० डिसेंबर, २०२२ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिध्द झाल्यानंतरही. निरंतर मतदार नोंदणी (continuous updation) निवडणुकीसाठी उमेदवाराचा नामनिर्देशन अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत करता येणार आहे. याचाच अर्थ ३० डिसेंबर पर्यत निरंतर पदवीधर मतदार नोंदणी (continuous updation) सुरु राहणार आहे असे राज्य निवडणूक आयोगाने पत्राद्वारे कळविले आहे .
पदवीधर मतदार संघातून फॉर्म नमुना 18 CLICK HERE
शिक्षक मतदार यादीत नोंदणीसाठी फॉर्म नंबर 19 CLICK HERE
पदवीधर मतदारसंघातील निवडणूकसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी Online कशी करावी ? CLICK HERE
पदवीधर व शिक्षक मतदारसंघातील निवडणूकसाठी मतदार यादीमध्ये नाव नोंदणी कार्यंक्रम जाहीर CLICK HERE
0 Comments