Subscribe Us

केंद्रप्रमुख पदोन्नती बाबतीत ग्रामविकास विभागाचे मार्गदर्शन परिपत्रक

 केंद्रप्रमुख पदोन्नती बाबतीत ग्रामविकास विभागाचे मार्गदर्शन परिपत्रक 


केंद्रप्रमुख पदोन्नतीकरीता मार्गदर्शन मिळण्यासाठी जिल्हा परिषद सोलापूर च्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्राम विकास विभागाकडे मार्गदर्शन मगितलेले होते दिनांक :- २४.०५.२०२३ च्या पत्रानुसार ग्रामविकास उपसचिव यांनी पुढील प्रमाणे मार्गदर्शन केले आहे   

पदभरती :- केंद्रप्रमुख पदभरतीच्या अनुषंगाने मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश लक्षात घेऊन   केंद्रप्रमुख (पदभरती) करतांना शालेय शिक्षण व क्रिडा विभागाच्या दि. ०१.१२.२०२२ च्या शासन निर्णयानुसार केंद्र प्रमुखांच्या पदभरतीचे प्रमाण ५०% पदोन्नतीने व ५०% मर्यादीत स्पर्धा परिक्षेप्रमाणे करण्यात यावी. मात्र ग्रामविकास विभागातील दि.१०.०६.२०१४ ची अधिसुचना अद्याप रदद वा अधिक्रमित केली नसल्यामुळे केंद्र प्रमुख पदभरती करतांना विषय निहाय विभागणी ही सदर अधिसुचनेमध्ये विहित केल्याप्रमाणे करण्यात यावी. 

पदोन्नती :-आपल्या संदर्भाधिन पत्रातील मुददा क्र. ५ च्या अनुषंगाने स्पष्ट करण्यात येते की, शासन अधिसुचना दि. १० जून २०१४ मध्ये ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षांपेक्षा कमी नाही इतकी अखंड सेवा पूर्ण केली असेल अशा उमेदवारांमधून सेवाजेष्ठतेच्या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येतील असे नमुद आहे त्यामुळे विशिष्ट विषयात प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणून सेवेचा उल्लेख अधिसूचनेत नाही त्यामुळे प्रशिक्षित पदवीधर शिक्षक म्हणुन कोणत्याही विषयात तीन वर्षे अखंड सेवा केल्यानंतर सध्या जो पदवीचा विषय आहे त्या विषयात संबंधित प्रशिक्षित पदवीधर शिक्षकांस केंद्र प्रमुख म्हणुन पदोन्नती दयावी.




Kendrapramukh All GR  केंद्रप्रमुख पदाचे विविध शासन निर्णय (पद निर्मिती , कर्तव्य व जबाबदारी)  १९९४ ते आजपर्यत  CLICK HERE

केंद्रप्रमुख  पदे प्राथमिक शिक्षकांमधून  50 टक्के पदोन्नतीने   व 50 टक्के विभागीय स्पर्धा परीक्षाने भरणार  शासन निर्णय दिनांक ०१.१२.२०२२   CLICK HERE

दिनांक ०१-१२-२०२२ पूर्वी केंद्र प्रमुख पदभरती संदर्भात निघालेल्या सर्व शासन निर्णय/ शासन शुद्धिपत्रक अधिक्रमित करून दि. ०१-१२-२०२२ रोजीचा शासन निर्णय अंतिम करण्यात आलेला असून सदर शासन निर्णयात विषया संबंधित कोणताही उल्लेख केलेला नाही. तसेच शासन शुद्धिपत्रक दि. ०९/०३/२०२३ नुसार पदोन्नती करीता प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) यामधूनच केंद्र प्रमुख पदी पदोन्नती बाबत निर्देश आहेत..

केंद्रप्रमुख पदाच्या भरतीसाठी शासनाचे नवे शुद्धीपत्रक केंद्रप्रमुख होण्यासाठी कोण आहेत पात्र शिक्षक ? CLICK HERE

त्यामुळे शासन निर्णय दिनांक ०१ / १२ / २०२२ व शासन शुद्धिपत्रक दि. ०९/०३/२०२३ अन्वये नियमानुसार पदोन्नती विषयक कार्यवाही करावी.

परिपत्रक दिनांक ८मे २०२३






Post a Comment

0 Comments