Subscribe Us

केंद्रप्रमुख पदोन्नतीकरीता मा. शिक्षण संचालक प्राथमिक पुणे मार्गदर्शन परिपत्रक

  केंद्रप्रमुख पदोन्नतीकरीता मा. शिक्षण संचालक प्राथमिक पुणे मार्गदर्शन परिपत्रक दिनांक ८मे २०२३

दिनांक २ मे २०२३च्या पत्रानुसार सोलापूर जिल्हापरिषद ने   केंद्रप्रमुख पदोन्नती विषयक मार्गदर्शन मागविले होते

त्याबाबत मा. शिक्षण संचालक प्राथमिक पुणे यांनी पुढीलप्रमाणे मार्गदर्शन दिले आहे 

 राज्यातील केंद्र प्रमुख भरती प्रक्रीये संदर्भात दि. ०१-१२-२०२२ रोजी काढलेल्या शासन निर्णयामध्ये केंद्र प्रमुखांची ५० टक्के पदे पदोन्नतीने व ५०% पदे मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे त्या त्या कोट्याच्या मर्यादेत भरण्यात येतील व दिनांक ०९/०३/२०२३ च्या शुद्धिपत्रकानुसार “ज्यांनी जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) या पदावर तीन वर्षापेक्षा कमी नाही इतकी अखंड नियमित सेवा ( शिक्षण सेवक कालावधी वगळून) पूर्ण केली असेल अशा उमेदवारामधून सेवा ज्येष्ठता व गुणवत्ता या आधारे पात्र उमेदवारांच्या पदोन्नतीने नेमणूक करण्यात येईल." असे निर्देश आहे.

Kendrapramukh All GR  केंद्रप्रमुख पदाचे विविध शासन निर्णय (पद निर्मिती , कर्तव्य व जबाबदारी)  १९९४ ते आजपर्यत  CLICK HERE

केंद्रप्रमुख  पदे प्राथमिक शिक्षकांमधून  50 टक्के पदोन्नतीने   व 50 टक्के विभागीय स्पर्धा परीक्षाने भरणार  शासन निर्णय दिनांक ०१.१२.२०२२   CLICK HERE

दिनांक ०१-१२-२०२२ पूर्वी केंद्र प्रमुख पदभरती संदर्भात निघालेल्या सर्व शासन निर्णय/ शासन शुद्धिपत्रक अधिक्रमित करून दि. ०१-१२-२०२२ रोजीचा शासन निर्णय अंतिम करण्यात आलेला असून सदर शासन निर्णयात विषया संबंधित कोणताही उल्लेख केलेला नाही. तसेच शासन शुद्धिपत्रक दि. ०९/०३/२०२३ नुसार पदोन्नती करीता प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) यामधूनच केंद्र प्रमुख पदी पदोन्नती बाबत निर्देश आहेत..

केंद्रप्रमुख पदाच्या भरतीसाठी शासनाचे नवे शुद्धीपत्रक केंद्रप्रमुख होण्यासाठी कोण आहेत पात्र शिक्षक ? CLICK HERE

त्यामुळे शासन निर्णय दिनांक ०१ / १२ / २०२२ व शासन शुद्धिपत्रक दि. ०९/०३/२०२३ अन्वये नियमानुसार पदोन्नती विषयक कार्यवाही करावी.

परिपत्रक दिनांक ८मे २०२३







Post a Comment

0 Comments