Subscribe Us

केंद्रप्रमुख पदोन्नतीकरिता महत्त्वाचे ग्रामविकास विभागाचे परिपत्रक

 केंद्रप्रमुख पदोन्नतीकरिता  महत्त्वाचे ग्रामविकास विभागाचे  परिपत्रक   दिनांक १२ सप्टेंबर २०२३ 

केंद्रप्रमुख पदोन्नतीकरिता मार्गदर्शन मिळणेबाबत.....

केंद्रप्रमुख पदोन्नती दरम्यान जिल्हा परिषदेत ग्रामविकास विभागाकडील अधिसूचना दि. १० जून, २०१४ मधील "प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) याबाबत संदिग्धता निर्माण झाली आहे.

असल्याने  मुख्य कार्यकारी अधिका जि.प. हिंगोली यांचेकडील पत्र क्र. जिपहि/शिविप्रा/ आस्था/ ९१५/२०२३ दि. २३/०८/२०२३.   व  सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक समिती यांचे पत्र दि. ०९.०९.२०२३. यांनी मार्गदर्शन मागितले होते 

 त्यानुसार ग्राम विभागाने  शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. डीआरई/१०९४/७०४/ प्राशि-१ दि. १८ जानेवारी, १९९५. चा संदर्भ देत पुढील आदेश दिले आहेत 

 "प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक) म्हणजे बी.ए./बी.कॉम / बी.एस्सी पदवीधर बी.एड" ही व्यावसायिक अर्हता धारण करणारे प्राथमिक शिक्षक असणे आवश्यक आहे असा आहे. त्यानुसार केंद्रप्रमुख पदोन्नती दरम्यान अधिसूचना दिनांक १० जून, २०१४ मधील आवश्यक पात्रतेमधील "प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (प्राथमिक)" या पदावर ३ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक राहील, म्हणजेच "बी.ए./बी.कॉम / बी.एस्सी. पदवीधर बी.एड" ही व्यावसायिक अर्हता धारण केलेल्या दिनांकापासून ३ वर्षाचा अनुभव पुर्ण करणारे शिक्षकच पात्र ठरतील.

वरील परिपत्रकाचा अर्थ लक्षात घेता पदोन्नती साठी  बी.ए./बी.कॉम / बी.एस्सी.  पदवी व बीएड आवश्यक  व बी एड नंतर ३ नंतरचा तीन वर्ष अनुभव आवश्यक.

केंद्रप्रमुख पदोन्नतीकरिता  महत्त्वाचे ग्रामविकास विभागाचे  परिपत्रक  



केंद्रप्रमुख पदाचे विविध शासन निर्णय (पद निर्मिती , कर्तव्य व जबाबदारी)  १९९४ ते आजपर्यत   CLICK HERE  

केंद्रप्रमुख पदोन्नतीकरीता मा. शिक्षण संचालक प्राथमिक पुणे मार्गदर्शन परिपत्रक  CLICK HERE


केंद्रप्रमुख पदाच्या भरतीसाठी शैक्षणिक पात्रताबाबत शासनाचे नवे शुद्धीपत्रक दिनांक ९ मार्च २०२३ च्या नुसार खालील शैक्षणिक पात्रता  मध्ये बदल केला आहे  CLICK HERE 

केंद्रप्रमुख पदाच्या भरतीसाठी शासनाचे नवे शुद्धीपत्रक केंद्रप्रमुख होण्यासाठी कोण आहेत पात्र शिक्षक ? CLICK HERE

Post a Comment

0 Comments