Subscribe Us

केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नती प्रक्रीयेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वेळोवेळी निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार व सुधारीत कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करण्याबाबत

 केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नती प्रक्रीयेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून वेळोवेळी निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार व सुधारीत कार्यपध्दतीनुसार कार्यवाही करण्याबाबत.



महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग,

शासन परिपत्रक क्रमांक:  दिनांक: २७ डिसेंबर, २०२३  वाचा  CLICK HERE

शालेय शिक्षण विभागाच्या शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. पीआरई-१०९४/७०४/(एक)/प्राशि-१, दि.१४/११/१९९४येथील दि. १४/११/१९९४ च्या शासन निर्णयान्वये राज्यात केंद्रप्रमुखांची पदे निर्माण करण्यात आलेली आहेत. त्यानुसार केंद्रप्रमुख पदाचा मुळ तांत्रिक प्रशासकीय विभाग हा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख पदाची पदनिर्मीती, नियुक्ती, शैक्षणिक अर्हता व पदोन्नतीसंदर्भातील धोरण निश्चितीची कार्यवाही देखिल शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून करण्यात येते. मात्र, केंद्रप्रमुख हे पद ग्रामविकास विभागाच्या अखत्यारित कार्यरत असल्याने शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून केंद्रप्रमुख पदाबाबत वेळोवेळी विहीत करण्यात

आलेल्या धोरणनिश्चितीनूसार महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मधील केंद्रप्रमुख पदाच्या सेवाप्रवेश नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्याची कार्यवाही करण्याबाबत त्याचप्रमाणे यासंदर्भातील सुधारीत अधिसूचना निर्गमित होईपर्यंत केंद्रप्रमुख संवर्गातील पदोन्नतीसंदर्भात संदर्भाधीन शासन निर्णय, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र.संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-१, दि.०१/१२/२०२२ वदि.२७/०९/२०२३  शासन निर्णयातील तरतूदीप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना देण्याबाबत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने संदर्भाधीन संदर्भ क्र. शासनपत्र, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग क्र. संकीर्ण-२०२२/प्र.क्र.८१/टिएनटि-१. दि.२७/०९/२०२३येथील शासनपत्रान्वये सूचित केले आहे.


केंद्रप्रमुख पदाची पदोन्नती प्रक्रीयेची कार्यवाही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निश्चित करण्यात आलेल्या धोरणानुसार करावी, की ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेतील तरतूदीनुसार कार्यवाही करावी, याबाबत क्षेत्रिय कार्यालयस्तरावर संभ्रम निर्माण होत असतो, परिणामी, प्रत्येक जिल्ह्यात केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नतीसंदर्भात स्वतंत्ररित्या कार्यपध्दती वापरुन वेगवेगळी कार्यवाही केली जाते. त्यानुषंगाने केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नतीच्या कार्यवाहीसंदर्भात राज्यात एकसूत्रता आणण्याच्या दृष्ट्रीने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार पुढीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत.


शासन परिपत्रक :-

महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मधील केंद्रप्रमुख पदाच्या सेवाप्रवेश नियमात सुधारणा करण्याची कार्यवाही ही विधीवत असल्याने, सदर विधीवत प्रक्रीयेस काही अवधी लागण्याची शक्यता आहे. त्यानुसार शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधीन संदर्भ क (३) येथील दि.०१/१२/२०२२ व दि.२७/०९/२०२३ च्या शासन निर्णयान्वये केंद्रप्रमुख पदासंदर्भात घोरणनिश्चितीप्रमाणे महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७  व शासन अधिसूचना क्र. सेवाप्र-२०१३/प्र.क्र.१०६/आस्था-९, दि.१०/०६/२०१४ मधील केंद्रप्रमुख पदाच्या सेवा प्रवेश नियमात आवश्यक त्या सुधारणा करण्याची कार्यवाही स्वतंत्ररित्या सुरु आहे.


२. सबब, महाराष्ट्र जिल्हा परिषदा जिल्हा सेवा (सेवाप्रवेश) नियम, १९६७ मध्ये आवश्यक त्या सुधारणेसंदर्भातील सुधारीत अधिसूचना निर्गमित होईपर्यंत केंन्द्रप्रमुख संवर्गातील पदोन्नतीसंदर्भात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या संदर्भाधीन संदर्भ क्र (३) येथील नमूद शासन निर्णयातील सुधारीत तरतूदीप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. त्याचप्रमाणे केंद्रप्रमुख पदाच्या पदोन्नतीसंदर्भात शासनाकडे मार्गदर्शनसाठी प्रलंबित प्रकरणाबाबतही नियुक्ती प्राधिकारी तथा सक्षम प्राधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर सदर मार्गदर्शक सूचनाप्रमाणे कार्यवाही करावी.


३. सदर शासन परिपत्रक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलका करण्यात आला असून त्यांचा संकेताक २०२३१२२७१३२७३३४५२० असा आहे. सदर शासन परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

केंद्रपमुख या पदावरील मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा व पदोन्नतीकरीता शैक्षणिक व  व्यावसायिक  अर्हतामध्ये बदल करण्यात आला आहे   

 शासन निर्णय  दिनांक: २७ सप्टेंबर, २०२३.  CLICK HERE


केंद्रप्रमुख  पदे प्राथमिक शिक्षकांमधून  50 टक्के पदोन्नतीने   व 50 टक्के विभागीय स्पर्धा परीक्षाने भरणार 

दिनांक १ डिसेंबर २०२२ चा शासननिर्णय  CLICK HERE








Post a Comment

0 Comments