Subscribe Us

मराठा समाज व खुला प्रवर्ग सामाजिक सर्वेक्षण तांत्रिक अडचणी व उपाय प्रश्ने उत्तरे Maratha Samaj and Open Category Social Survey Technical difficulties and solution questions Answers

महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील कुटुंबाचे सर्वेक्षण  


तांत्रिक अडचणी व उपाय 

CLICK HERE  

नेहमी विचारले जाणारे प्रश्न   CLICK HERE 

Download MSBCC Survey - Android Mobile Application (V1.0.3) here.
MSBCC Survey - अँड्रॉइड मोबाइल ॲप ( V१.०.३) येथे डाउनलोड करा.

सर्वेक्षणामध्ये नवबौद्धांच्या समावेशाबाबत मार्गदर्शक परिपत्रक CLICK HERE 

CLICK HERE 

आपल्या अँड्रॉइड मोबाइल मधून जुने MSBCC Survey मोबाइल ॲप काढून, नवीन MSBCC Survey ॲप कसे इंस्टॉल करावे? (येथे पहा / इथे क्लिक करा)

महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय आयोग यांच्यातर्फे महत्त्वाच्या सूचना (येथे पहा / इथे क्लिक करा



महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग मराठा आरक्षण सर्व्हे अँप वापरताना येणारे संदेश, त्याचा अर्थ आणि उपाय (येथे पहा / इथे क्लिक करा)


प्रश्न:-1) प्रगणक यांचा मोबाईल क्रमांक बदलला आहे/चुकीचा झाला आहे. त्यामुळे लॉगीन होत नाही. काय करावे?

उत्तर:-या अॅप मध्ये काम करण्यासाठी आयोगाकडे आपला मोबाईल क्रमांक नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. पर्यवेक्षक यांचे मार्फत तालुकास्तरीय नोडल अधिकारी यांना रिपोर्ट करावा. नोडल अधिकारी यांनी आयोगाकडुन कर्मचारी नाव, मोबाईल क्रमांक रजिस्टर करून घेणे आवश्यक आहे.

प्रश्न:-इंटरनेट नसताना सर्वेक्षण करता येईल काय?

उत्तर-होय, ज्या ठिकाणी इंटरनेट नाही त्या ठिकाणी देखील मोबाईल अॅप द्वारे सर्वेक्षण करता येईल. आपल्या मोबाईल मधिल लोकेशन चालु असणे आवश्यक आहे. त्यानंतर इंटरनेट क्षेत्रात आल्यानंतर डेटा अंतिमरित्या सर्वरवर अपलोड करावा लागेल.

मराठा समाज व खुला प्रवर्ग सर्वेक्षण संपूर्ण माहिती pdf 

CLICK HERE

प्रश्न:- अॅप दररोज डाउनलोड करून इंस्टाल करणे व साईन इन करणे आवश्यक आहे काय?

उत्तरः नाही. एकदा अॅप डाउनलोड करून इंस्टाल केल्यानंतर आपल्या मोबाईल मध्ये कायमस्वरूपी साठविले जाते. स्क्रिन वरील अॅप मध्ये MSBCC SURVEY नावाने icon दिसेल. तसेच एकदा लॉगीन केल्यावर पुन्हा साईन इन करण्याची आवश्यकता नाही.

प्रश्नः- अॅप मध्ये अक्षांश, रेखांश, उंची दाखवत नाही. काय करणे आवश्यक आहे.?

उत्तर- अॅप मध्ये अक्षांश, रेखांश व उंची दाखवत नसल्यास 1) त्या समोर Get Values दिसत असल्यास त्या बटणावर क्लिक करून पहा. अॅप बंद करून चालु करून पहा. तरीही दिसत नसल्यास 2) आपल्या मोबाईल मधिल सेटिंग मध्ये Location मध्ये सेवा चालु करा. अॅप बंद करून चालु करून पहा तरीही दिसत नसल्यास 3) आपल्या मोबाईलचा इंटरनेट व ब्लूटूथ सेवा बंद करून चालु करा. अॅप बंद करून चालु करून पहा- तरीही दिसत नसल्यास 4) आपल्या मोबाईल Airplane mode (Flight mode) वर टाका.5 सेकंदानंतर पुन्हा मोबाईल चालु करा व मोबाईल डाटा व ब्लूटूथ सेवा चालु करा.


प्रश्नः-कुटुंबाचा सर्वे करताना कुटुंबप्रमुख उपस्थित राहणे शक्य नसल्यास त्या कुटुंबातील स्त्री असल्यास सर्वेक्षण करावे का ?

उत्तर- होय, मुलाखत देण्यास कुटुंबप्रमुख उपस्थित नसल्यास इतर सदस्य यांचेकडून मुलाखत घेऊन सर्वेक्षण करणे आवश्यक आहे.


प्रश्न:-पहिल्याच पेजवर A1-नाव व A2 जात निवडली व save करताना Please check validation messages & enter proper data हा संदेश येतो. काय करावे.?

उत्तर-अनिवार्य असलेले सर्व प्रश्न मध्ये माहिती योग्य रित्या भरलेली नाही. किंवा एखादा प्रश्नाचे उत्तर लिहिणे बाकी आहे. पहिल्या पेजवरील A1-नाव लिहिताना इंग्रजी भाषेत लिहावे.

प्रश्नः-स्थलांतरित कुटुंबाचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे काय ? व त्यांचा पत्ता कोणता लिहावा?

उत्तर-स्थलांतरीत कुटुंबाचे सर्वेक्षण करणे आवश्यक आहे. त्या कुटुंबाचा मूळ निवासस्थान पत्ता-प्रश्न क्रमांक B23 मध्ये लिहण्यात यावा. तसेच प्रश्न क्रमांक C 111, 112 मध्ये कुटुंब स्थलांतरीत बाबत माहिती नमूद करावी.

मराठा समाज व खुला प्रवर्ग सामाजिक सर्वेक्षण मार्गदर्शक Video  CLICK HERE

प्रश्न:-आरक्षित प्रवर्गातील कुटुंबाचा सर्वे करताना अॅप मध्ये सही अपलोड करण्याची आवश्यकता आहे का?

उत्तर-आरक्षित प्रवर्गातील कुटुंबाचा सर्वे जात निवडा करून माहिती save केली असता पुर्ण होतो. त्या कुटुंब प्रमुखाची सही मोबाईल अॅप मध्ये अपलोड करण्याची आवश्यकता नाही. मात्र आपल्या सोबत असलेल्या नोंदवहीत सही/अंगठा घ्यावा.


प्रश्न:-आरक्षित प्रवर्गातील कुटुंबाचा सर्वे पुर्ण झाला आहे. असा संदेश आल्यानंतर पुढील कुटुंबाचे प्रश्न, सामाजिक परिस्थिती, आर्थिक स्थिती व आरोग्य माहिती भरण्यास पर्याय येत नाही. काय करावे?

उत्तर-आरक्षित कुटुंबाची जात प्रवर्ग निवडा करून साठवा केल्यास सर्वे पुर्ण होतो. पुढील माहिती (मुलाखत) घेण्याची आवश्यकता नाही. आपण सर्वे साठी दुसऱ्या कुटुंबाकडे जावे.


प्रश्न:-ड्रोपडाऊन मेनू मध्ये जात निवडताना जात सापडत नाही. जात कशी शोधावी?

उत्तर-जात निवडताना सर्च पर्याय मध्ये त्या जातीचे इंग्रजी मधिल आद्याक्षर मधिल तिन ते चार अक्षरे टाईप करावीत. त्याखाली त्या आद्याक्षरावरून सुरु होणाऱ्या जाती दिसतील. योग्य ती जात शोधण्यास मदत होईल.


प्रश्नः एखादी खुल्या प्रवर्गातील किंवा इतर धर्मातील जात सापडत नसल्यास काय करता येईल?

उत्तर-एखादी खुल्या प्रवर्गातील किंवा परराज्यातील स्थलांतरित कुटुंबाची जात सापडत नसल्यास जात निवडताना other (इतर) हि निवडावी. त्याखाली A2 1) पर्याय मध्ये इंग्रजी भाषेत जात टाईप करावी. इतर धर्मातील असल्यास पुढे प्रश्न क्रमांक 15 मध्ये धर्म निवडावा.

प्रश्नः-कुटुंबाकडे मोबाईल क्रमांक नाही. मात्र अॅप मध्ये मोबाईल क्रमांक बंधनकारक आहे काय करावे?


उत्तर-कुटुंबाकडे मोबाईल क्रमांक नसल्यास मोबाईल क्रमांक म्हणून दहा वेळा 9 म्हणजेच 9999999999 लिहावा.

प्रश्नः कुटुंब मराठा नसेल तर इतर खुल्या प्रवर्गातील असल्यास धर्म निवडणे आवश्यक आहे काय ?

उत्तरः- होय, प्रश्न A12 मध्ये मराठा नसेल तर इतर खुल्या प्रवर्गातील कुटुंबासाठी प्रश्न A15 मध्ये धर्म निवडणेआवश्यक आहे.


प्रश्नः-कुणबी प्रमाणपत्र असल्यास त्या कुटुंबाची सर्वेक्षण ची पुढील माहिती भरणे आवश्यक आहे का?

उत्तर-कुटुंब मराठा असल्यास व त्याची जात कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी यापैकी असल्यास व त्याच्याकडे त्या जातीचे प्रमाणपत्र असेल तर त्या कुटुंबाचा सर्वे या ठिकाणी पुर्ण होतो. त्याची पुढील माहिती (मुलाखत) घेण्याची आवश्यकता नाही.

प्रश्न:-एखाद्या कुटुंबाची जात कुणबी आहे. मात्र त्याच्याकडे जात प्रमाणपत्र नाही. त्या कुटुंबाचे पुढील सर्वेक्षण करणे गरजेचे आहे का ?

उत्तर-होय, एखाद्या कुटुंबाची जात कुणबी असुन देखील त्यांचेकडे कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र नसेल तर पुढील सर्व मोड्यूल माहिती भरणे आवश्यक आहे.


प्रश्न: कोणत्या प्रवर्गाचे सर्वेक्षण करताना कुटुंबाचे प्रश्न, आर्थिक स्थिती, कुटुंबाची सामाजिक माहिती, कुटुंबाचे आरोग्य हे मोड्यूल भरणे तसेच मुलाखत देणाराची सही अपलोड करणे आवश्यक आहे.?

उत्तर-मराठा समाज तसेच इतर खुल्या प्रवर्गातील आणि कुणबी जात असुन देखील जात प्रमाणपत्र नसेल तर त्या कुटुंबासाठी पुढील मोड्यूल माहिती भरणे आवश्यक आहे. व त्यासाठी मुलाखत देणाराची सही अपलोड करणे आवश्यक आहे.


प्रश्नः-कोणत्या प्रवर्गसाठी कुटुंबाचे प्रश्न, आर्थिक स्थिती. कुटुंबाची सामाजिक माहिती, कुटुंबाचे आरोग्य हे मोड्यूल भरणे तसेच मुलाखत देणाराची सही अपलोड करणे आवश्यक नाही?

उत्तर-आरक्षित प्रवर्गातील कुटुंब तसेच कुणबी प्रमाणपत्र असेल तर त्या कुटुंबासाठी पुढील मोड्यूल व मुलाखत देणाराची सही अपलोड करणे आवश्यक नाही.


प्रश्न:-एखाद्या कुटुंबाचे जातीची खात्री करण्यासाठी जात प्रमाणपत्र असल्याचे जातीचा दाखला पाहणे आवश्यकआहे का?

उत्तर-नाही. आपण मुलाखत द्वारे प्रश्नावलीतून सामाजिक व आर्थिक परिस्थिती माहिती मोबाईल मध्ये नमूद करत आहोत. कुटुंबप्रमुख यांनी दिलेल्या उत्तरांच्या अनुषंगाने माहिती भरावी.


प्रश्न:-मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंब सर्वेक्षण साठी मोड्यूल विंडो दिसते मात्र मुलभुत माहिती भरली जात नाही काय करावे?

उत्तर-मोड्यूल विंडो दिसत असल्यास मराठा व खुल्या प्रवर्गातील कुटुंब बाबत मुलभुत माहिती अगोदरच भरली असल्याने त्यापुढिल कुटुंबाचे प्रश्न माहिती भरणे आवश्यक आहे. त्यासाठी मोड्यूल निवडून CONTINUE MODULE वर क्लिक करावे.


प्रश्न:-मोड्यूल मध्ये माहिती भरताना क्रमाने भरणे आवश्यक आहे काय ?

उत्तर-होय, मोड्यूल मध्ये माहिती भरताना कुटुंबाचे प्रश्न, आर्थिक स्थिती, कुटुंबाची सामाजिक माहिती, कुटुंबाचे आरोग्य या क्रमानेच माहिती भरणे आवश्यक आहे.


प्रश्न:-अॅप मध्ये माहिती भरताना काही ठिकाणी Only Char असा error येतो. नक्की काय करावे?

उत्तर-अॅप मध्ये ज्या ठिकाणी Only Char म्हणजेच फक्त अक्षरी असा error येतो त्या ठिकाणी माहिती English मध्ये भरणे आवश्यक आहे.


प्रश्न:- अॅप मध्ये माहिती भरताना काही ठिकाणी Please specify other text असा संदेश येतो. काय करावे?

उत्तर-ज्या वेळी कोणत्याही प्रश्नाचे उत्तर लिहताना "इतर" हा पर्याय निवडता त्यावेळी त्याखाली तपशील टाईप करणे आवश्यक आहे.

प्रश्नः-क्रिमीलेअर गटात मोडते म्हणजे काय? त्याठिकाणी काय लिहावे? (प्रश्न-C-79)

उत्तर-क्रीमिलेअर गट म्हणजे ज्या कुटुंबाचे मागील तिन सालात वार्षिक उत्त्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे असे कुटुंब. संबंधित कुटुंबाचे वार्षिक उत्त्पन्न 8 लाखापेक्षा अधिक असल्यास होय उत्तर लिहावे. तसेच वार्षिक उत्त्पन्न 8 लाखापेक्षा कमी असल्यास नाही उत्तर लिहावे.


प्रश्नः-कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या कोणत्या ठिकाणी भरावी?

उत्तर-कुटुंबाचे आरोग्य मोड्यूल मध्ये प्रश्न क्रमांक E-160 मध्ये कुटुंबातील एकूण सदस्यांची संख्या लिहावी.


प्रश्नः-कुटुंबातील नमूद केलेल्या सर्व सदस्यांची माहिती भरणे आवश्यक आहे काय ? व ती कोणत्या ठिकाणी भरण्यात यावी.?

उत्तर-व्यक्तीसाठीच्या प्रश्नाचा विभाग मध्ये कुटुंबातील नमूद केलेल्या सर्व सदस्यांची माहिती भरणे आवश्यक आहे.

प्रश्न:-व्यक्तीसाठीच्या प्रश्नाचा विभाग मध्ये कुटुंबप्रमुखाचे नाव येते त्याची माहिती भरणे आवश्यक आहे काय ? उत्तर-होय, त्या ठिकाणी प्रथम कुटुंबप्रमुख माहिती भरणे आवश्यक आहे. घराच्या प्रमुखाशी नाते म्हणून स्वतः निवडणे आवश्यक आहे. व खालील NEXT पर्याय वापरून पुढील सर्व सदस्यांची माहिती भरावी.


प्रश्नः मुलाखत देणाराची सही कशी घ्यावी.?

उत्तर-व्यक्तीसाठीच्या प्रश्नाचा विभाग सर्व माहिती भरून झाल्यानंतर त्याखालील मुलाखत देणाराची स्वाक्षरी वर क्लिक करावे. व TAKE PICTURE वर क्लिक करावे. आपला मोबाईलचा कॅमेरा OPEN होईल. त्याठिकाणी रजिस्टर वर केलेल्या सहीचा फोटो घ्यावा. किंवा अंगठा असल्यास रजिस्टर वर घेतलेल्या अंगठा चा फोटो घ्यावा. फोटो काढल्यावर त्या ठिकाणी OK व Cancel बटण दिसतील.ok बटण क्लिक करावे. त्याखालील save बटण क्लिक करावे.


प्रश्न: सर्व मोड्यूल मधिल माहिती भरून झाल्यानंतर केलेला सर्वे कसा साठविण्यात यावा.?

उत्तर-सर्व मोड्यूल मधिल माहिती भरून झाल्यावर तसेच मुलाखत देणाराची सही save केल्यावर सर्व मोड्यूल असलेली विंडो दिसेल त्याखालील SUBMIT SURVEY पर्यायावर क्लिक करून केलेला सर्वे साठविण्यात यावा.

प्रश्न:-SUBMIT केलेला कुटुंबाचा सर्वे EDIT करून दुरुस्ती करता येईल काय ?

उत्तर-एकदा SUBMIT केलेला सर्वे पुन्हा EDIT करता येणार नाही.


प्रश्नः-कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्व कुटुंबाचे दरवाजावर MSBCC लिहावे काय ?

उत्तर-होय, आरक्षित प्रवर्ग, कुणबी प्रवर्ग तसेच मराठा व खुल्या प्रवर्गातील सर्व कुटुंब ज्यांचे आपण सर्वेक्षण केले आहे. त्या सर्व कुटुंबाचे दरवाजावर MSBCC लिहून त्याभोवती गोल करण्यात यावा.

प्रश्न:-केलेला सर्वे ची आकडेवारी कोणत्या ठिकाणी पाहायला मिळेल.?

उत्तर- अॅप च्या होमपेजवरील आडव्या तिन रेषा दिसतील. त्यावर क्लिक केल्यास त्याखाली तिन पर्याय दिसतील त्यातील पर्याय क्रमांक 2 मध्ये Sync Data to server मध्ये आकडेवारी दिसेल.


प्रश्न:-ऑफलाईन (इंटरनेट) नसताना केलेला सर्वेक्षण अंतिम रित्या सर्वर वर अपलोड कसे करावे?

उत्तर- अॅप च्या होमपेजवरील आडव्या तिन रेषा दिसतील. त्यावर क्लिक केल्यास त्याखाली तिन पर्याय दिसतील त्यातील पर्याय क्रमांक 2 मध्ये Sync Data to server मध्ये total Un-SyncFiles दिसतील. त्याखालील upload Data पर्याय क्लिक करून ऑफलाइन केलेला किंवा इंटरनेट नसताना केलेला सर्वेक्षण डेटा अंतिमरित्या सर्वरवर अपलोड करण्यात यावा.

प्रश्न:- ऑफलाईन (इंटरनेट) नसताना केलेला सर्वेक्षण डेटा Un-SyncFiles अंतिम सर्वरवर अपलोड झाल्या नाहीत तर त्या delete होतील का?

उत्तर-नाही. जो पर्यंत अॅप uninstall करत नाही. तोपर्यंत फाईल delete होणार नाही. मात्र तरीही दररोज केलेले सर्वेक्षण त्याच दिवशी अपलोड करावे.


प्रश्न:-इंटरनेट असुनही काही फाईल Un-SyncFiles मध्ये दिसत आहे. काय करावे?

उत्तर-इंटरनेट असूनही सर्वर स्पीड तसेच इतर तांत्रिक कारणाने केलेले सर्वेक्षण फाईल Un-SyncFiles मध्ये दिसतात. त्यावेळी त्याखालील upload Data पर्याय क्लिक करून केलेला सर्वेक्षण डेटा अंतिमरित्या सर्वरवर अपलोड करण्यात यावा.


सौजन्य - राज्य मागासवर्ग आयोग व  गोखले इन्स्टिट्युट

श्री. सतिश थेटे तहसिलदार अकोले, जि. अहमदनगर

श्री. विजय तिटमे (उपाध्यापक-जि.प.शाळा)- श्री. पोपट चौधरी (उपाध्यापक-जि.प.शाळा)- श्री. मंगेश फापाळे (तलाठी-तहसिल कार्यालय अकोले)


 9



Post a Comment

0 Comments