Subscribe Us

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाजाबाबत

 


शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाजाबाबत 


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागा अंतर्गत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने दिनांक 19 सप्टेंबर 2022 रोजी निर्गमित केलेल्या एका परिपत्रकानुसार शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाजाबाबत पुढील प्रमाणे सविस्तर निर्देश दिले आहे.

शालेय पोषण आहार योजना ही केंद्र पुरस्कृत योजना आहे या योजनेअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवी मधील विद्यार्थ्यांना मध्यान्न भोजनाचा लाभ देण्यात येतो. अन्न शिजवून विद्यार्थ्यांना वाटप करणे व त्या अनुषंगाने इतर कामकाज करणे करिता शाळा स्तरावर स्वयंपाकी तथा मदतनीस यांची शाळा व्यवस्थापन समितीमार्फत नियुक्ती करण्यात येते. तथापि स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे विविध संघटनांकडून शाळा प्रशासनाकडून इतर कामे उदाहरणार्थ शाळा उघडणे बंद करणे स्वच्छतागृहांची साफसफाई शालेय वर्ग खोल्यांची साफसफाई करणे इत्यादी त्यांच्याकडून करून घेण्यात येत असल्याबाबत निवेदन प्राप्त होत आहे

शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत कार्यरत स्वयंपाकी तथा मदतनीस यांचे कामकाजाबाबत   CLICK HERE

शासन निर्णयातील तरतुदीनुसार संपाची कथा मदतीचा कामाचे स्वरूप विशद करण्यात आले आहे ते पुढील प्रमाणे.

  1. अन्न शिजवण्याचे काम करणे.
  2. तांदूळ व  धान्यादी मालाची साफसफाई करणे.
  3. शाळेमध्ये विद्यार्थ्यांना आहाराचे व जेवणाच्या जागेवर करणे.
  4. शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी आहाराचे सेवन केल्यानंतर साफसफाई करणे स्वयंपाक गृहासह तसेच सांडलेल्या अन्नाची योग्य विल्हेवाट लावणे.
  5. भांड्यांची साफसफाई करणे व जेवल्यानंतर ताटांची स्वच्छता करणे.
  6. पिण्याचे पाणी भरणे व जेवताना विद्यार्थ्यांना पाणी पुरवणे.
  7. शाळा व शाळेचा परिसर स्वच्छ ठेवणे.
  8. अन्न शिजवणाऱ्या यंत्रणेच्या आहारविषयक नोंदी ठेवणे. 

मध्यान्ह भोजन योजना  ( MDM )दैनंदिन उपस्थिती  भरण्यासाठी APP व WEBSITE  ची माहिती CLICK HERE

मध्यान्ह भोजन आहार योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांचे आधार कार्ड असणे आवश्यक CLICK HERE 

मध्यान्ह  भोजन आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी भरारी  पथके आणि दक्षता पथके स्थापन  CLICK HERE
(जिल्हा व तालुका भरारी पथकाकडून होणार तपासणी  भरारी पथक भेटीचा नमुना अहवाल) 

वरील प्रमाणे उल्लेखित कामाव्यतिरिक्त इतर कोणत्याही स्वरूपाची कामे स्वयंपाकी तथा मदतनीस यांचेकडून करून घेण्यात येऊ नये. याबाबत आपल्या अधिनिस्त योजनेस पात्र असणाऱ्या सर्व शाळांना योग्य ते निर्देश निर्गमित करण्यात यावे व भविष्यात याबाबत अशा स्वरूपाच्या तक्रारी उद्भवणार नाही याची दक्षता घ्यावी.

वरील प्रमाणे निर्देश शिक्षण संचालक प्राथमिक यांनी सर्व जिल्ह्यांच्या शिक्षण अधिकाऱ्यांना सदर पत्रानुसार दिले आहे


Post a Comment

0 Comments