Subscribe Us

केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येणार



 केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात येणार 

केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन  दिनांक  ३१ ऑक्टोबर २०२२ परिपत्रक   CLICK HERE 

मा . शिक्षण सहसंचालक  यांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकारी यांना  केंद्रप्रमुखांची रिक्त पदे सरळसेवेने व मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे भरण्याकरीता स्पर्धा परीक्षेचे आयोजन करणे साठी केंद्रप्रमुखांचा बिंदूनामावलीनुसार ४० टक्के सरळसेवा व ३० टक्के विभागीय मर्यादित परीक्षेच्या रिक्त पदांचा तपशिल मागितला आहे 

 मा. मंत्री (शालेय शिक्षण), यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक ०७/०९/२०२२ रोजी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे येथे पार पडलेल्या बैठकीत मा. मंत्री महोदयांनी केंद्र प्रमुखांची दिक्त पदे विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा व पदोन्नती द्वारे ५० : ५० भरण्याचे प्रमाण निश्चित करण्याचे निर्देश दिलेले आहेत.

 ५० : ५० नुसार  कार्यवाहीस काही कालावधी लागेल तो पर्यंत केंद्रप्रमुख भरती बाबतचे यापूर्वीचे सर्व शासन निर्णय व दिनांक १० जुन, २०१४ ची अधिसूचना विचारात घेऊन केंद्रप्रमुखांचा बिंदूनामावलीनुसार ४० टक्के सरळसेवा व ३० टक्के विभागीय मर्यादित परीक्षेच्या रिक्त पदांचा तपशिल   संचालनालयास त्वरित उपलब्ध करुन द्यावी  असे आदेश दिले आहेत 

  केंद्रप्रमुखांच्या रिक्त पदांचा तपशिल उपलब्ध झाल्यावर  सर्व माहिती एकत्रित करुन आयुक्त, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे याना सादर करण्यात येऊन सदर भरती प्रक्रिया प्रस्तावित करण्यात येणार आहे 

शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदांचा अभ्यासक्रम व महत्वाची संदर्भ पुस्तके CLICK HERE 

 केंद्रप्रमुखांची रिक्त पदे भरणेबाबत दिनांक १९ सप्टेबरचे २०२२  आदेश  CLICK HERE 

मंत्रालयीन स्तरावरील केंद्रप्रमुख समस्या निवारण सभेचे इतिवृत्त 26 जुलै 2022 वाचा  CLICK HERE

केंद्रप्रमुख पदाचे विविध शासन निर्णय (पद निर्मिती , कर्तव्य व जबाबदारी)  १९९४ ते आजपर्यत   CLICK HERE  


Post a Comment

0 Comments