Subscribe Us

शाळांना सन २०२१ -२०२२ ची संचमान्यता मिळणार व सन २०२२-२०२३ च्या संचमान्यताबाबत सूचना

शाळांना सन २०२१ -२०२२ ची संचमान्यता मिळणार व सन २०२२-२०२३ च्या संचमान्यताबाबत सूचना  दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ चे पत्र 

शाळांना सन २०२१ -२०२२ ची संचामान्यता मिळणार असून तश्या सूचना मा शिक्षण संचालक यांनी शिक्षणाधिकारी  यांना दिल्या आहेत 

 दिनांक १४.०६.२०२१ च्या शासन पत्रान्वये  शैक्षणिक वर्ष सन २०२१-२२ ची तात्पुरती संच मान्यता आधार क्रमांक असलेले विद्यार्थी गृहीत धरून करण्याचे निर्देश दिलेले होते. त्यानुसार राज्यातील सर्व शाळांची तात्पुरती संच मान्यता दिनांक ३०.१२.२०२१ रोजीच्या आधार क्रमांक नोंद असलेल्या विद्यार्थी संख्येच्या आधारे करण्यात आलेली होती.

परंतु आता शासनाच्या दिनांक ९ जून २०२२च्या निर्देशान्वये दिनांक २८.०२.२०२२ चे पत्र रद्द करून सन २०२१-२२ च्या संच मान्यता या  सन २०२०-२१ च्या संच मान्यताप्रमाणेच कायम ठेवाव्यात असे शासन आदेश आहेत. त्यामुळे सन २०२१-२२ च्या संच मान्यता  शिक्षणाधिकारी  लॉगीनला उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून शिक्षणाधिकारी यांनी   आपल्या स्तरावरून सर्व शाळांना वितरीत करण्याची कार्यवाही करावी असे आदेश मा शिक्षण संचालक यांनी  दिलेले आहेत 

शासन पत्राचा नेमका अर्थ - सन  २०२१-२२ च्या संच मान्यता या  सन २०२०-२१ च्या संच मान्यताप्रमाणेच कायम ठेवाव्यात असे शासन आदेश याचा अर्थ असा आहे कि सन  २०२१-२२ चा शाळांचा पट कमी-अधिक झाला तरी  सन २०२०-२१ च्या संच मान्यताप्रमाणेच शाळांना मान्य शिक्षक पदे मिळणार आहेत तशी संच मान्यता प्रत शाळांना मिळणार आहेत 

तसेच मा शिक्षण संचालक यांनी सन २०२२-२०२३ च्या संचमान्यता साठी शाळा स्तरावर Mis Match व Invalid Aadhar असलेल्या विद्याथ्र्यांची माहिती UPDATE करण्याच्या सूचना दिल्या असून  २०२२-२३ ची संच मान्यता ही विद्यार्थी  आधार नुसार करण्याचा शासनाचा विचार आहे 



शासन व मा संचालक यांचे संचमान्यता बाबतीत चे आदेश पहा 

 संचमान्यता 2022-23 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माहितीसाठी  Login सूरू

  ३० नोव्हेंबर च्या विद्यार्थी संख्येनुसार होणार सन २०२२ - २०२३  ची संचमान्यता 

2021-22 ची संचमान्यता रद्द 2020-21 संचमान्यतेनुसार होणार शिक्षक समायोजन  व बदल्या 

आधार आधारित संच मान्यता बाबतीत मा शिक्षण संचालक यांचे पत्र

 SANCHMANYATA - सन २०२१-२०२२ आधार क्रमांक आधारित संचमान्यताबाबत ... दि ०४ मार्च २०२२ च्या पत्रातील सूचना 

Student Portal वरील संचमान्यता  करणेसाठी  आधार नोंदणीसाठी ३१/०३/२०२२ पर्यत मुदत वाढ 



Post a Comment

0 Comments