Subscribe Us

संचमान्यता 2022-23 साठी विद्यार्थी पोर्टलवर आधार कार्ड आंँनलाईन नोंदणीसाठी २८ फेब्रुवारी पर्यत मुदत शिक्षण संचालक यांचे आदेश

 संचमान्यता 2022-23 साठी  विद्यार्थी पोर्टलवर आधार कार्ड आंँनलाईन नोंदणीसाठी 28 फेब्रुवारी पर्यत मुदत शिक्षण संचालक यांचे आदेश

केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी  करणार तपासणी 

दिनांक 18 फेब्रुवारीचे शिक्षण संचालक यांचे  पत्र 



दिनांक 07/02 /2023 रोजी मा. उपमुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देण्यात आलेल्या सूचनेनुसार Student Portal मधील विद्याथ्यांच्या आधार बाबतच्या कामकाजासाठी अंतिम कालमर्यादा निश्चित करून देण्यात आली आहे ..

मा. उपमुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 07/02/2023 रोजी मुंबई येथे झालेल्या बैठकीमध्ये  विषयाबाबत देखील चर्चा करण्यात आली. चर्चेदरम्यान आधार नोंदणी व दुरुस्ती तातडीने करणेबाबत मा. उपमुख्यमंत्री महोदयांनी सूचना केलेल्या आहेत.

त्यानुसार मा. आयुक्त शिक्षण यांनी संदर्भीय पत्राच्या अनुषंगाने सदर कामाकरिता कालमर्यादा निश्चित करून
 सदर काम तातडीने पूर्ण करण्याबाबत आदेशित केले आहे.

संच मान्यतेसाठी दिनांक 30/11/2022 रोजी असणारी विद्यार्थी संख्या विचारात घेतली जाणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांची आधार नोंदणी झालेली नसेल त्यांची आधार नोंदणी करणेबाबत तसेच ज्या विद्याथ्यांच्या आधार नोंदणी मध्ये दुरुस्त्या असतील अशा सर्व विद्यार्थ्यांची आधार बाबतची माहिती दिनांक 28/02/2023 पर्यंत पूर्ण करावयाची आहे. 

सदर कामी तालुका स्तरावर उपलब्ध असलेले आधार कीट यंत्रणा पूर्ण क्षमतेने वापरायची आहे. सदर यंत्रणेमध्ये काही अडचणी असल्यास आपल्या स्तरावर तातडीने दुरुस्त करून सदर कामास प्राधान्य द्यायचे आहे. यासाठी सर्व  केंद्र प्रमुख व विस्तार अधिकारी इत्यादी यांच्या कामाचे नियोजन करून ज्या शाळेतील विद्यार्थ्याचे आधार बाबतची जी काम अपूर्ण आहेत असे विद्यार्थी सरल प्रणालीवरून शाळेकडून उपलब्ध करून घ्यावे आणि सदर विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधून काम पूर्ण करावे. तसेच बऱ्याच शाळांमध्ये विद्यार्थी पटावर जरी असले तरी ते शाळाबाह्य झालेले असतात. याचा देखील तपास करून त्याबाबत योग्य ती कार्यवाही करावी. असे आदेश देण्यात आले आहे 

शासन व मा संचालक यांचे संचमान्यता बाबतीत चे आदेश पहा 

शाळांना सन २०२१ -२०२२ ची संचमान्यता मिळणार व सन २०२२-२०२३ च्या संचमान्यताबाबत सूचना 

 संचमान्यता 2022-23 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माहितीसाठी  Login सूरू

  ३० नोव्हेंबर च्या विद्यार्थी संख्येनुसार होणार सन २०२२ - २०२३  ची संचमान्यता 

2021-22 ची संचमान्यता रद्द 2020-21 संचमान्यतेनुसार होणार शिक्षक समायोजन  व बदल्या 

आधार आधारित संच मान्यता बाबतीत मा शिक्षण संचालक यांचे पत्र

 SANCHMANYATA - सन २०२१-२०२२ आधार क्रमांक आधारित संचमान्यताबाबत ... दि ०४ मार्च २०२२ च्या पत्रातील सूचना 

Student Portal वरील संचमान्यता  करणेसाठी  आधार नोंदणीसाठी ३१/०३/२०२२ पर्यत मुदत वाढ 

Post a Comment

0 Comments