Subscribe Us

केंद्रप्रमुख पदाच्या विभागीय परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा ? HOW TO FILL CLUSTERHEAD ONLINE FORM ?

केंद्रप्रमुख पदाच्या विभागीय परीक्षेसाठी साठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा ?

HOW TO FILL CLUSTERHEAD ONLINE FORM ?



महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत जानेवारी २०२४ मध्ये केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 चे महाराष्ट्र राज्यातील विविध केंद्रावर महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षकांना केंद्रप्रमुख पदावर विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 निवडीद्वारे नियुक्ती देण्यासाठी आयोजित करण्यात येत आहे. 

 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा 2023 साठी  सर्व शिक्षकांना अर्ज करण्याची संधी उपलब्ध झालेली आहे  माहितीसाठी  CLICK HERE


 केंद्रप्रमुख विभागीय मर्यादित स्पर्धा परीक्षा - २०२३  जाहिरात  संपूर्ण माहिती CLICK HERE

फार्म भरताना आवश्यक बाबी CLICK HERE 

Guidelines for scanning and Upload of Documents CLICK HERE 

केंद्रप्रमुख भरती परीक्षा कोरा अर्ज CLICK HERE 

केंद्रप्रमुख परीक्षा भरलेला अर्ज  CLICK HERE

कोणत्या चुका टाळाव्यात    CLICK HERE

केंद्रप्रमूख परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज कसा भरावा?



अर्ज नोंदणी कशी करावी ? रजिस्ट्रेशन करताना स्व हस्तलिखित प्रतिज्ञापत्र व अपलोड करण्यासाठी लागणारी कागदपत्रे कोणती आहेत याबाबत आपणास माहिती असणे आवश्यक आहे ती पुढीलप्रमाणे आहे 

ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी वेबलिंक - https://ibpsonline.ibps.in/mscepapr23

IBPS  कंपनीने दिलेल्या GUIDELINE 

अर्ज कसा करावा ?

ऑनलाईन पध्दतीने दि. ०१/१२/२०२३ ते ०८/१२/२०२३ या कालावधीत आवेदनपत्र व परीक्षा शुल्क स्वीकारले जातील   अर्जासाठी इतर कोणतीही पद्धत स्वीकारली जाणार नाही.

अर्ज नोंदणी

  •  पात्रतेच्या अटींची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांनी MSCE च्या वेबसाइटवर जाऊन अर्जाच्या लिंकवर क्लिक करून किंवा    https://ibpsonline.ibps.in/mscepapr23  या लिंक वर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे.
  •  अर्ज नोंदणी करण्यासाठी, "नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा टॅब निवडा आणि नाव, संपर्क तपशील आणि ईमेल आयडी प्रविष्ट करा. प्रणालीद्वारे तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड तयार केला जातो आणि स्क्रीनवर प्रदर्शित केला जातो उमेदवाराने तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड नोंदवावा. तात्पुरती नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड दर्शविणारा ईमेल आणि एसएमएस देखील पाठविला जातो 



ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी खालील गोष्टींसह / साठी तयार असावे-

  • छायाचित्र, स्वाक्षरी, अंगठ्याचा ठसा आणि हस्तलिखित घोषणा स्कॅन करा आणि छायाचित्र आणि स्वाक्षरी दोन्ही आवश्यक वैशिष्ट्यांचे पालन करत असल्याची खात्री करा:
  •  एक वैध वैयक्तिक ईमेल आयडी आणि मोबाईल क्रमांक असावा, जो ही भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत सक्रिय ठेवावा. MSCE नोंदणीकृत ई-मेल आयडी आणि मोबाइल नंबरवर परीक्षेसाठी कॉल लेटर्सशी संबंधित संप्रेषण पाठवू शकते. उमेदवाराकडे वैध वैयक्तिक ई-मेल आयडी नसल्यास, त्याने/तिने ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी त्याचा / तिचा / तिचा नवीन ई-मेल आयडी आणि मोबाइल क्रमांक तयार करावा आणि तो ईमेल खाते आणि मोबाइल क्रमांक कायम राखला पाहिजे.



केंद्रप्रमुख भरती ऑनलाईन अर्ज सादर करतांना  पुढील कागदपत्रे अपलोड करावी लागतील.

  • (अ) पासपोर्ट साईज फोटो - उमेदवाराने त्याचा स्कॅन केलेला नवीनतम पासपोर्ट साईज (4.5 सेमी x 3.5 (सेमी) फोटो .
  • आकार  200x300 pixels
  • फाईल साईज 20 kb - 50kb
  • (ब) स्वाक्षरी - उमेदवाराने त्याची पांढऱ्या कागदावर काळ्या शाईने स्वाक्षरी करून स्कॅन केलेली स्वाक्षरी 
  • आकार 140 X 60 pixels
  • फाईल साईज 10kb - 20kb
  • (क) डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी उमेदवाराने - त्याच्या डाव्या हाताच्या अंगठयाची निशाणी ( 3 सेमी x 3 सेमी) पांढऱ्या कागदावर काळ्या / निळया शाई मध्ये स्कॅन केलेली प्रतिमा अपलोड करणे आवश्यक आहे. डाव्या हाताचा अंगठा नसेल अशा उमेदवारांनी उजव्या हाताचा अंगठा
  • ड) स्व- हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्र उमेदवाराने त्याच्या - स्वहस्ताक्षरातील इंग्रजीतील खालील प्रतिज्ञापत्र (10 सेमी x 5 सेमी) पांढऱ्या कागदावर काळ्या / निळ्या शाई मध्ये लिहिलेले अपलोड करणे आवश्यक आहे.
  • आकारमान 800 X 400 pixels in 200 DPI
  • फाईल साईज 30kb 100 kb

स्व. हस्ताक्षरातील प्रतिज्ञापत्राचा नमूना

I (Name of candidate), hereby declare that all the information submitted by me in the application form is correct, true and valid. I will present the supporting documents as and when required." ( उमेदवाराचे नाव) घोषित करतो की, मी अर्जामध्ये सादर केलेली सर्व माहिती योग्य सत्य आणि येथे आहे. मी सदरची कागदपत्रे आवश्यक असेल

अर्जदाराचे नाव व स्वाक्षरी

सदरचे प्रतिज्ञापत्र उमेदवाराने स्वतः च्या हस्ताक्षरात इंग्रजीमध्येच लिहून त्याची स्कॅन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे. प्रतिज्ञापत्र टंकलिखित केलेले, दुसऱ्या व्यक्तीने अथवा अन्य भाषेत लिहिलेले आढळून आल्यास उमेदवारी रद्द करण्यात येईल (लिहून न शकणाऱ्या अंथ अथवा अल्प दृष्टी उमेदवारांनी टंकलिखित प्रतिज्ञापत्रावर स्वतःच्या डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा उमटवून सदरच्या प्रतिज्ञापत्राची प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.

 केंद्रप्रमुख पदांचा अभ्यासक्रम व महत्वाची संदर्भ पुस्तके  CLICK HERE

केंद्रप्रमुख या पदाचा फॉर्म पुढील सहा टप्प्यांमध्ये भरावा लागतो 




टप्पा क्रमांक १   

BASIC INFORMATION 

  • . यामध्ये स्वतःचे पूर्ण नाव, प्रथम नाव वडिलांचे नाव आणि आडनाव दहावी, बारावीच्या बोर्डाच्याप्रमाणपत्रांमध्ये जसे आहे तसे भरावे
  • . स्वतःचा मोबाईल नंबर व पर्यायी मोबाईल नंबर अचूक भरावा.
  •  स्वतःची ईमेल आयडी अचूक नोंदवावी.
  • स्वतःची माहिती पडताळून व्हॅलिड करून घ्यावी.
  • पहिला टप्पा भरून झाल्यानंतर तुम्ही एकाच वेळी सहा टप्पे पूर्ण करू शकता. तसेच टप्प्याटप्प्याने फॉर्म भरायचा असल्यास व्हॅलिड झाल्यानंतर तुमचं युजरनेम व पासवर्ड तयार होतो तो जतन करून ठेवण्यास विसरू नका. लॉगिन केल्यानंतर आपण ज्या टप्प्यावर आहे त्या टप्प्यावर परत माहिती भरू शकतो.


टप्पा क्रमांक २ 

फोटो आणि सही नमुना

  • फोटो हा मोबाईल मध्ये काढून सुद्धा अपलोड करू शकता परंतु फोटोची साईज 50Kb पेक्षा जास्त नसावी. (20 ते 50 KB असावा)
  •  2. पांढऱ्या कागदावर सही करून सहीचा फोटो काढून अपलोड करावा. फोटोची साईज 20kb पेक्षा जास्त नसावे. (10 ते 20 KB असावा) तसेच सही ब्लॉक व कॅपिटल अक्षरांमध्ये नसावी


BASIC DETAIL 

  •  या टप्प्यामध्ये विस्तृत अशी माहिती भरायची असून कार्यरत जिल्हा परिषद नाव, कार्यरत शाळेच्या जिल्हा परिषदेचे नाव, शालार्थ आयडी, कास्ट, दिव्यांग असल्याची माहिती, धर्म, आधार क्रमांक, नॅशनॅलिटी , परीक्षेसाठी सेंटरची निवड, दहावीच्या बोर्डाच्या सर्टिफिकेटवर असलेले नाव, लिंग, जुळे भाऊ असतील तर त्याबद्दल ची माहिती, सध्याचा पत्ता व कायमचा पत्ता.
  •  तसेच दहावी, बारावी, पदवी पदव्युत्तर शिक्षण तसेच इतर शिक्षण याबद्दलची माहिती भरणेआहे. ही माहिती भरत असताना संबंधित परीक्षेच्या बोर्डाची निवड व्यवस्थित करावी कारण भारतातील सर्व बोर्ड दिलेले आहे, त्यानंतर पूर्ण केलेला शिक्षणक्रमाची निवड, stream व फॅकल्टी ची निवड, पासिंग सर्टिफिकेट दिनांक, मिळालेले परसेंटेज याची माहिती काळजीपूर्वक भरावी. 3. त्यानंतर आपली सध्याची कार्यरत शाळा जॉइनिंग डेट तसेच पदवीधर शिक्षक आहात का प्रशिक्षित प्राथमिक शिक्षक व इतर राहिलेली माहिती भरुन व्हॅलीड करावी सेव करावी एकदा माहिती व्हालिङ केल्यास बदलता येत नाही याची गंभीयन नोंद घ्यावी.

महत्त्वाचे शाळेचा अनुभव हा पदवी प्राप्त दिनांक नंतरचा असावा तरच पुढील प्रक्रियापूर्ण  होते.

टप्पा क्रमांक ४

 आपण जी माहिती भरलेली आहे ती सर्व माहिती आपणास दिसेल व ती काळजीपूर्वक तपासावी व  माहिती व्हॅलीड करून घ्यावी


टप्पा क्रमांक ५

UPLOADING  

चारही टप्पे पूर्ण झाल्याशिवाय पाचवा टप्पा ओपन होणार नाही आपली सर्व माहिती बरोबर असल्यास माहिती अपलोड करावी

टप्पा क्रमांक ६ 

आपल्या संवर्गानुसार आवश्यक असलेले फी भरून शेवटचा टप्पा पूर्ण करून घ्यावा.

  • फी ऑनलाइन ने भरता  येते  b डेबिट कार्ड्स (RuPay / Visa/Mastercard / Maestro), क्रेडिट कार्ड, इंटरनेट बँकिंग, कॅश कार्ड्स / मोबाइल  ऑनलाइन अर्जामध्ये तुमची देय माहिती सबमिट केल्यानंतर, कृपया सर्व्हरकडून माहिती मिळण्याची प्रतीक्षा करा. दुहेरी शुल्क टाळण्यासाठी बँक किंवा रिफ्रेश बटण दाबू नका.
  •  ई- पावती तयार न होणे पेमेंट फेल्युअर दर्शवते, पेमेंट अयशस्वी झाल्यास, उमेदवारांना त्याचा तात्पुरता नोंदणी क्रमांक आणि पासवर्ड वापरून पुन्हा लॉग इन करण्याचा आणि पेमेंटची प्रक्रिया पुन्हा करण्याचा सल्ला दिला जातो.
  • उमेदवारांनी ई- पावती आणि फी तपशील असलेल्या ऑनलाइन अर्जाची प्रिंटआउट घेणे आवश्यक आहे. कृपया अर्जदाराने केलेल्या चुकांमुळे अवैध अर्ज MSCE द्वाटे जमा केलेल्या अर्जाच्या पैशाच्या परताव्याच्या कोणत्याही दाव्याचा विचार केला जाणार नाही..  


एक टप्पा पूर्ण भरून झाल्याशिवाय समोरचा टप्पा ओपन होत नाही आणि आपल्या टप्प्यांमध्ये जर काही त्रुटी असल्यास व्हॅलीड होत नाही त्यामुळे माहिती काळजीपूर्वक भावी जर माहिती व्हॅलिड होत नसेल तर सर्व माहिती पहिल्यापासून चेक करावे व लाल अक्षरात आलेल्या सूचनांचे पूर्तता करावी अशा प्रकारे फॉर्म भरून घ्यावा, सदर माहिती शिक्षकांना फॉर्म भरताना उपयोगी पडावी यासाठी निर्माण केलेली आहे म्हणून शिक्षकांनी स्वतः पडताळणी करूनच आपापली माहिती भरावी.


    केंद्रप्रमुख पदासाठी अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती

    १)पूर्ण नाव 

    २)शालार्थ आयडी

    ३)जात प्रवर्ग 

    ४)दिव्यांग आहात का ?

    ५)असल्यास प्रकार 

    ६)प्रमाणपत्र क्रमांक 

    ७)धर्म 

    ८)आधार क्रमांक 

    ९)परीक्षा केंद्र 

    १०)जन्म दिनांक 

    ११)एसएससी प्रमाणपत्र प्रमाणे नाव 

    १२)विवाहित आहात का 

    १३)वडिलांचे नाव 

    १४)आईचे नाव 

    १५)पती किंवा पत्नीचे नाव 

    १६)पूर्ण पत्ता पिनकोडसह 

    १७)मोबाईल क्रमांक 

    १८)ई-मेल आयडी 

    १९)शैक्षणिक माहिती 

    (अर्हता. विद्यापीठ.  उत्तीर्ण दिनांक. टक्केवारी.  श्रेणी)

    १)एस एस सी 

    २)एच एस सी 

    ३)डी एड 

    ४)पदवी

    ५)पदव्युत्तर पदवी

    ६)बीएड

    ७)इतर

    २०)आपण प्राथमिक पदवीधर शिक्षक आहात का ?

    २१)आपण प्राथमिक शिक्षक आहात का ?

    २२)सध्याच्या जिल्ह्यातील सेवा १)सध्याची शाळा

    २)जिल्हा 

    ३)पद

    ४)रुजू दिनांक 

    २३)अवगत भाषा

    २४)फोटो

    २५)स्वाक्षरी (काळया पेनने करावी)

    २६)डाव्या हाताच्या अंगठ्याचा ठसा

    २७) खालील प्रमाणपत्र स्व हस्ताक्षरात लिहून स्वाक्षरी करावी


    शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदांचा अभ्यासक्रम व महत्वाची संदर्भ पुस्तके  CLICK HERE

    केंद्रप्रमुख पदोन्नती बाबतीत ग्रामविकास विभागाचे मार्गदर्शन परिपत्रक CLICK HERE

    Kendrapramukh All GR  केंद्रप्रमुख पदाचे विविध शासन निर्णय (पद निर्मिती , कर्तव्य व जबाबदारी)  १९९४ ते आजपर्यत  CLICK HEREक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे

    केंद्रप्रमुख  पदे प्राथमिक शिक्षकांमधून  50 टक्के पदोन्नतीने   व 50 टक्के विभागीय स्पर्धा परीक्षाने भरणार  शासन निर्णय दिनांक ०१.१२.२०२२   CLICK HERE

    केंद्रप्रमुख पदाच्या भरतीसाठी शासनाचे नवे शुद्धीपत्रक केंद्रप्रमुख होण्यासाठी कोण आहेत पात्र शिक्षक ? CLICK HERE.


    Post a Comment

    0 Comments