Subscribe Us

स्टूडन्ट पोर्टलवर अवैध ठरलेल्या विद्यार्थ्याची पडताळणी करुन संचमान्यतेसाठी ग्राह्य धरणार invalid and adhar pending students to be counted for sanchmanhyata

स्टूडन्ट पोर्टलवर अवैध ठरलेल्या विद्यार्थ्याची पडताळणी करुन संचमान्यतेसाठी  ग्राह्य धरणार ....  invalid and adhar pending  students to be counted for sanchmanhyata


शाळेतील दिनांक ३०/११/२०२२ रोजी पटावर असलेल्या परंतु आधार अवैध ठरलेल्या विद्यार्थ्याची पडताळणी करुन संचमान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत  चे आदेश मा शिक्षण संचालक यांनी दिले आहेत 

शिक्षण संचालक यांचे परिपत्रक CLICK HERE 

विद्यार्थ्याची पडताळणी प्रपत्र CLICK HERE  

दिनांक ३०/११/२०२२ रोजी स्टूडेंट पोर्टलवर असलेल्या विद्यार्थ्यापैकी दिनांक १५/०६/२०२३ अखेर आधार वैध असलेली विद्यार्थी संख्या विचारात घेवून सन २०२२-२३ ची संच मान्यता अंतिम करण्यात येणार आहे.

सध्यस्थितीत किमान ८० टक्के विद्यार्थी वैध विचारात घेवून अंतरिम संच मान्यता करण्यात आलेल्या आहेत, शाळांकडून विद्यार्थी वैध करण्याची कार्यवाही  सुरु आहे. परंतु विद्यार्थ्याच्या नावातील तफावतीमुळे अथवा अन्य कोणत्याही कारणास्तव विद्यार्थी अवैध ठरत असतील अथवा कांही विद्यार्थ्याकडे आधार कार्ड उपलब्ध नसतील व अशा  विद्यार्थ्यामुळे शाळेतील सन २०२२-२३ च्या मंजूर पदावर विपरित परिणाम होत असेल तर अशा शाळा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे या प्रकारच्या विद्याथ्यांच्या नावाच्या यादीसह अर्ज करतील व शाळांच्या बाबतीत संबंधित गटशिक्षणाधिकारी हे अशा विद्याध्यापैकी  विद्यार्थी वर्गात नियमित उपस्थित असतील तर अशा विद्यार्थ्यांची  शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांच्याकडून याबाबतची योग्य तो खात्री करतील व त्यांच्या पडताळणीमध्ये नियमित असलेले विद्यार्थी संच मान्यतेसाठी विचारात घेतले जातील. 

विद्यार्थ्याची पडताळणी करताना खालील बाबीची खात्री करावी. (प्रमाणपत्र पडताळणी प्रपत्र १ से ३ सोबत जोडले आहे.)

  • १. नाव, लिंग किंवा जन्मतारीख नृळत नसलेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत अशा विद्यार्थ्यांची शाळेत असलेली नोंद व विद्यार्थ्याची प्रत्यक्ष शाळेत उपस्थित असल्याची खात्री करून व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखवले गेले नाहीत याची शाहनिशा करून असे विद्यार्थी संबंधित शाळेच्या संच मान्यतेकरीता ग्राहय धरण्यात यावेत.
  • 2 ज्या विद्यार्थ्याची आधार क्रमांकासाठी नोंद केली आहे अथवा आधार कार्ड उपलब्ध नाहीत असे विद्यार्थी संबंधित शाळेत नियमित येत असल्याची व सदर विद्यार्थी जवळपासच्या अन्य शाळांमध्ये दाखल केले नाहीत याची तसेच त्यांचे आधार कार्ड का तयार होवू शकले नाहीत याची शहानिशा करून असे विद्यार्थी संच मान्यतेकरीता ग्राहय धरण्यात यावेत.
  • ३. शाळेतील विद्यार्थी  डूप्लिकेट (Duplicate) असल्याचे स्टुडट पोर्टलवर दर्शवित असेल तर असा विद्यार्थी नेमका कोणत्या शाळेत शिकत आहे याची क्षेत्रीय करून खात्री करून योग्य त्या शाळेत सदर विद्यार्थ्याची नोंद करावा.
  • ४. शाळेकडून अर्ज प्राप्त झालेल्या प्रत्येक शाळेत संबंधित शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख यांनी समक्ष भेट देवून अर्ज केलेल्या विद्यायाची माहिती तपासण्यात यावी व मुख्याध्यापकांनी अर्ज केलेला प्रत्येक विद्यार्थी संचमान्यतेत भरण्यासाठी पात्र आहे का नाही याची खात्री करावी. 
  • ५. ज्या शाळांची किमान ९० टक्के विद्यार्थी शाळांनी वैध केलेले आहेत त्याच शाळातील उर्वरित विद्यार्थ्यांची त्यांच्या अडचणी लक्षात घेवून पडताळणी करण्यात यावी.
  • ६. आधार  invalid /अनप्रोसेसड/आधार क्रमांक नसलेले विद्यार्थी शाळेत नियमित येत असल्याचे विविध बाबी लक्षात घेवून खात्री पटल्यानंतरच त्यास संच मान्यतेसाठी ग्राहय धरण्यात यावे.. आवश्यक ती पडताळणी केल्यानंतर संबंधित शाळेच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या लॉगीनवर सदर विद्यार्थ्यांना संचमान्यतेसाठी विचारात घेण्याबाबत योग्य तो सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल अथवा सदर अहवालाच्या आधारे सदर विद्यार्थ्यांना विचारात घेवून संच मान्यता सन २०२२-२३ करण्यात येतील.

वर नमुद केल्यानुसार शालेय विद्यार्थ्यापैकी ज्यांचे आधार अवैध ठरलेल्या व आधार कार्ड नसलेल्या विद्यार्थ्याच्या बाबतीत योग्य तो खात्री करुन पुढील आवश्यक ती कार्यवाहि करावी असे शिक्षण संचालक यांनी परिपत्रकाद्वारे सूचित केले आहे 

आतापर्यंतचे संचमान्यता बाबतचे सर्व शासन निर्णय व परिपत्रके CLICK HERE

Sanchmanyta available in school login CLICK HERE

संचमान्यता 2022-23 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माहितीसाठी  Login सूरू

Student पोर्टल वर आधार validation update करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय 



शासन व मा. संचालक यांचे संचमान्यता बाबतीत चे आदेश पहा 

शाळांची संचमान्यता आधार वैध Valid विद्यार्थी संख्येनुसार  करण्याचे शिक्षण संचालक यांचे आदेश 

  ३० नोव्हेंबर च्या विद्यार्थी संख्येनुसार होणार सन २०२२ - २०२३  ची संचमान्यता 

शाळांना सन २०२१ -२०२२ ची संचमान्यता मिळणार व सन २०२२-२०२३ च्या संचमान्यताबाबत सूचना 

2021-22 ची संचमान्यता रद्द 2020-21 संचमान्यतेनुसार होणार शिक्षक समायोजन  व बदल्या 

आधार आधारित संच मान्यता बाबतीत मा शिक्षण संचालक यांचे पत्र

 SANCHMANYATA - सन २०२१-२०२२ आधार क्रमांक आधारित संचमान्यताबाबत ... दि ०४ मार्च २०२२ च्या पत्रातील सूचना 

Student Portal वरील संचमान्यता  करणेसाठी  आधार नोंदणीसाठी ३१/०३/२०२२ पर्यत मुदत वाढ 



Post a Comment

0 Comments