Subscribe Us

विद्यार्थ्याचे आधार १५ जून २०२३ पर्यंत वैध करून घेण्यास पुन्हा मुदतवाढ

विद्यार्थ्याचे आधार १५ जून २०२३ पर्यंत वैध करून घेण्यास पुन्हा मुदतवाढ 


विद्यार्थ्याचे आधार १५ जून २०२३ पर्यंत वैध करून घेणेबाबत...

माध्यमिक शिक्षण संचालक यांचे परिपत्रक  CLICK HERE

 सन २०२२ २०२१ ची अंतरिम संच मान्यता हि ३०/११/२०२२ रोजी असलेल्या पटसंख्येपैकी सध्यस्थितीत वैध  आधार असलेल्या विद्यार्थी संख्येवर केली आहे. सन २०२२-२३ मधील विद्यार्थ्याचे आधार वैध करण्यासाठी वेळेवेळी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. तथापी अद्यापही काही शाळातील विद्यार्थी Without Aadhar/Invalid/Mismatch मध्ये दिसून येत आहेत. त्यामुळे विद्यार्थी संख्या असून देखील अवैध् आधार संख्येमुळे शाळांच्या संच मान्यतेमध्ये मंजूर पदे कमी झालेली दिसून येत आहे.

आपल्या शाळेचा पट व त्यानुसार किती पदे मान्य होतात ते पहा CLICK  HERE

शाळेतील Without Aadhar / Invalid / Mismatch मधील सर्व विद्यार्थ्याचे आधार वैध करण्यासाठी शाळांना दिनांक १५ जून २०२३ पर्यंत अंतिम मुदत देण्यात येत आहे. सदर मुदतीनंतर सन २०२२-२३ ची संच मान्यता अंतिम करण्यात येणार असल्याने १५ जून पर्यंत विभागातील व जिल्ह्यातील Without Aadhar / Invalid / Mismatch मधील सर्व विद्यार्थ्याचे आधार तात्काळ वैध करून  घ्यावेत. १५ जून २०२३ नंतर कोणत्याही प्रकारची मुदतवाढ दिली जाणार नाही. Without Aadhar/Invalid/Mismatch मधील विद्यार्थ्यांमुळे १५ जून २०२३ नंतरच्या सन २०२२-२३ च्या अंतिम संच मान्यतेमध्ये मंजूर पद संख्या गतवर्षीच्या मंजूर पदसंख्येच्या तुलनेत कमी झाल्यास त्यास ती शाळा व आपण जबाबदार असाल त्याबाबत १५ जून २०२३ नंतर कोणतीही सबब ऐकून घेतली जाणार नाही याची दक्षता घ्यावी.

Without Aadhar/Invalid / Mismatch मधील सर्व विद्यार्थ्याचे आधार १५ जून २०२३ पर्वत वैध करून घेण्यासाठी आपल्या विभागातील व जिल्ह्यातील संबंधित तालुक्याच्या गटशिक्षणाधिकारी यांच्या काढून संबंधित शाळांशी संपर्क साधून त्यांच्या कडून सदर विद्यार्थ्याचे आधार तात्काळ वैध करून घ्यावेत त्यासाठी सर्व तालुक्यांना आधार मशिन देखील पुरवण्यात आलेल्या आहेत. सर्व शिक्षण उपसंचालक यांनी आपल्या जिल्ह्यातील Without Aachar / Invalid / Mismatch असलेल्या विद्यार्थ्याचा आढावा घेऊन संबंधित जिल्ह्याकडून १५ जून २०२३ पर्यंत सर्व विद्यार्थ्याचे आधार वैध करुन घ्यावेत.

अशा सूचना परिपत्रक द्वारे माध्यमिक शिक्षण संचालक  यांनी सर्व जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी यांना दिल्या आहेत


  संचमान्यतासाठी ग्राह्य धरलेल्या 30 नोव्हेंबरची विद्यार्थी संख्या Student portal वर उपलब्ध  झाली आहे  पाहूया कशी पहायची?  CLICK HERE

आतापर्यंतचे संचमान्यता बाबतचे सर्व शासन निर्णय व परिपत्रके CLICK HERE

Sanchmanyta available in school login CLICK HERE

संचमान्यता 2022-23 शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी माहितीसाठी  Login सूरू

Student पोर्टल वर आधार validation update करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय 



शासन व मा. संचालक यांचे संचमान्यता बाबतीत चे आदेश पहा 

शाळांची संचमान्यता आधार वैध Valid विद्यार्थी संख्येनुसार  करण्याचे शिक्षण संचालक यांचे आदेश 

  ३० नोव्हेंबर च्या विद्यार्थी संख्येनुसार होणार सन २०२२ - २०२३  ची संचमान्यता 

शाळांना सन २०२१ -२०२२ ची संचमान्यता मिळणार व सन २०२२-२०२३ च्या संचमान्यताबाबत सूचना 

2021-22 ची संचमान्यता रद्द 2020-21 संचमान्यतेनुसार होणार शिक्षक समायोजन  व बदल्या 

आधार आधारित संच मान्यता बाबतीत मा शिक्षण संचालक यांचे पत्र

 SANCHMANYATA - सन २०२१-२०२२ आधार क्रमांक आधारित संचमान्यताबाबत ... दि ०४ मार्च २०२२ च्या पत्रातील सूचना 

Student Portal वरील संचमान्यता  करणेसाठी  आधार नोंदणीसाठी ३१/०३/२०२२ पर्यत मुदत वाढ 


Post a Comment

0 Comments